शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याच्या हल्ल्यात हरिण दगावले, दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:09 IST

कठोरा मार्गावरील फार्महाऊसमधील घटना, पोलीस, वनविभागाची चमू पोहोचली अमरावती : पाणी, चाऱ्याच्या शोधात असलेल्या हरणांच्या कळपावर कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ...

कठोरा मार्गावरील फार्महाऊसमधील घटना, पोलीस, वनविभागाची चमू पोहोचली

अमरावती : पाणी, चाऱ्याच्या शोधात असलेल्या हरणांच्या कळपावर कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक हरिण दगावले, तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना कठोरा मार्गावर एका फार्महाऊसमध्ये रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. घटनास्थळी वनविभाग आणि पोलिसांची चमू दाखल झाली होती. जखमी हरणांवर वडाळी येथे उपचार करण्यात येत आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कठोरा मार्गावर लुंगे लॉनच्या मागे असलेल्या भामकर फार्महाऊसमध्ये हरिणांचे कळप शिरले. यादरम्यान येथील कुत्र्यांनी हरिणांवर जोरदार हल्ला चढविला. यात एका हरणाचे लचके तोडल्याने ते जागीच ठार झाले, तर दोन हरीण गंभीर जखमी झाले आहे. पहाटे भ्रमंतीला असलेल्या काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी फार्महाऊसच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी कुत्र्यांना हाकलून लावले. कसेबसे दोन जखमी हरणांना कुत्र्यांच्या तावडीतून साेडविले. नागरिकांनी हा प्रकार गाडगेनगर पोलीस आणि वनविभागाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर वनविभागाचे रेस्क्यू पथकही घटनास्थळी दाखल झाले. फॉर्म हाऊसच्या तारेच्या कुंपणात हरणांचे कळप अडकल्याने कुत्र्यांना हल्ला करता आला, अशी माहिती आहे. कुत्र्यांनी हल्ला करण्यापूर्वीच काही हरिण बाहेर पडले, हे विशेष. नागरिकांनी जखमी हरणांना पाणी पाजून सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाकडे सुपूर्द केले.

------------

कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन हरीण जखमी झाले आहेत. त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. ते सुद्धा गंभीर आहे. पशु वैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत.

- अमोल गावनेर, रेस्क्यू पथक, वनविभाग.