शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्ट्याच्या तुलनेत अर्ज कमी

By admin | Updated: March 18, 2016 00:19 IST

मागेल त्याला शेततळेसाठी अमरावती जिल्ह्यासाठी ३१५९ इतका लक्ष्यांक देण्यात आला आहे.

थंड प्रतिसाद : मागेल त्याला शेततळे योजनेला तोकड्या अनुदानाचा फटकाअमरावती : मागेल त्याला शेततळेसाठी अमरावती जिल्ह्यासाठी ३१५९ इतका लक्ष्यांक देण्यात आला आहे. त्यासाठी १८६ अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यांकरिता शासनाने ३,१५९ एवढे उद्दिष्ट दिले आहे. यामध्ये सर्वाधिक शेततळे भातकुली तालुक्यात ५१४ तर चिखलदरा तालुक्यात २० शेततळ्यांचे उद्दिष्ट्य आहे. त्यानंतर इतर तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी ३ हजार १५९ एवढा लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत आतापर्यंत केवळ १८६ अर्ज प्राप्त झाल्याचे, तर ३४० अर्जांचे रजिस्ट्रेशन करण्यात आल्याची माहिती आहे. राज्य शासनाने नुकतीच मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली. मात्र यासाठी यापूर्वी आघाडी सरकारने शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी सुमारे ८२ हजार रूपयांचे अनुदान दिले होते. मात्र आताच भाजपा सरकारने शेततळे निर्मितीसाठी केवळ ५० हजारांचे अनुदान प्रत्येकी एका शेततळा करीता देण्याचे जाहीर केले आहे. मात्र एवढया अल्पशा कि मतीत शेततळे साकारणे अशक्य असल्याचे शेतकरी व जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्याला शेततळे निमिर्तीसाठी देण्यात आलेल्या लक्ष्यांकाच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून तोकड्या अनुदानामुळे अल्प प्रतिसाद लाभत असल्याचे अर्ज संख्येवरून दिसून येते. त्यामुळे शेततळे अनुदानाचे रक्कमेत शासनाने वाढ करणे अपेक्षित आहे. त्याशिवाय प्रशासनला उद्दिष्ट्यपूर्तीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)असे आहेत निवडीचे निकष या योजनेसाठी किमान दीड एकर शेती असणारा शेतकरी पात्र आहे. दारिद्र्यरेषेखालील व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसाची अग्रक्रमाणे निवड होणार आहे. अर्ज प्राप्तीच्या ज्येष्ठता यादीनुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांची पसंती व जमिनीच्या प्र्रकारानुसार शेततळे घेता येणार आहे. दुष्काळ निवारण उपायांतर्गत निधी या कामासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.आॅनलाईन अर्जाची डोकेदुखीशेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने नव्याने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे.याकरिता पहिल्यांदाच महा-ईसेवा केंद्रामार्फत अथवा आपले सरकार संकेतस्थळावरील प्रोफाईलवरुन लाभार्थ्यांनी मागणी अर्ज आॅनलाईन करावे. लागणार आहेत.मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यासाठी गावस्तरावर आवश्यक सोई सुविधा उपलब्ध नसल्याने आर्थिक फटका सहन करून यासाठी चकरा माराव्या लागत आहेत.