शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू अनैसर्गिक तरीही टाळले शवविच्छेदन

By admin | Updated: September 17, 2016 00:15 IST

शंकर महाराज यांच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या सागर पात्रे या मुलाचा अनैसर्गिक मृत्यू झाला.

संशयास्पद : विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा करण्यात आला दावाअमरावती : शंकर महाराज यांच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या सागर पात्रे या मुलाचा अनैसर्गिक मृत्यू झाला. तरीही त्याच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले नाही. सागरचे शवविच्छेदन न करण्यामागे काय कारण होते, हे गुढ उकलणे आता महत्त्वपूर्ण झाले आहे. तिवसा तालुक्यातील वरूडा या गावचा सागर पात्रे हा विद्यार्थी शंकर महाराज यांच्या आश्रमात शिकायला होता. पुजादी कार्यात तो जादाकाळ रमायचा. महाराजांच्या सेवेत तो असायचा. १ सप्टेंबर २००६ रोजी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान सागर अत्यवस्थ अवस्थेत आढळला. सागरला विजेचा धक्का लागल्यामुळे त्याची अशी अवस्था झाल्याचे आश्रमातील लोकांनी सागरच्या थोरल्या भावाला सांगितले. विजेचा धक्का कसा लागला याबाबतची माहिती रंजक आहे. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक इलेक्ट्रिक डोअरबेलची विद्युतभारीत वायर लोंबकळत होती. मुख्य द्वाराजवळून येताना सागरच्या डोक्याला त्या वायरचा स्पर्श झाला. वायरमधील धातुच्या उघड्या तारांचा शरीराला स्पर्श झाल्यामुळे सागरला विजेचा धक्का लागला, अशी माहिती देण्यात आली. सागरला उपचारासाठी अमरावतीपर्यंत हलविताना त्याचा मृत्यू झाला. सागरचा मृत्यू झाल्याचे कारण नैसर्गिक नव्हतेच. सागरला अखरेचा उपाय म्हणून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. नियमानुसार, अशा मृत्युनंतर शवविच्छेदन करण्यात येते. शवविच्छेदनादरम्यान मृत्यूचे नेमके कारण डॉक्टरांकडून कळू शकेल, हा त्यामागचा उद्देश असतो. सागरचा मृत्यू खरेच विजेच्या धक्क्याने झाला की आजार, विषप्रयोग, मार, दुखापत अशी इतर कारणे मृत्युमागे आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येतो. गरज भासल्यास शरीरातील काही अवयवांचे नमुने (व्हिसेरा) शास्त्रीय तपासणीसाठी उच्च तंत्रज्ञात उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. रासायनिक तपासणी करून डॉक्टर्स मृत्यूचे नेमके निदान करीत असतात. या प्रक्रियेला सागरच्या मृत्यूनंतर छेद देण्यात आला. शोधमोहिमेदरम्यान 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार, सागरसोबत असलेल्या आश्रमातील काही लोकांनी शवविच्छेदन होऊ न देण्यासाठी शक्य तो सर्व प्रभाव वापरला. त्या प्रभावामुळेच शवविच्छेदन टाळले गेले. आश्रमात शिकण्यासाठी असलेल्या सागरचा मृत्यू अनैसर्गिकरित्या झाला असतानाही त्याचे शवविच्छेदन का करण्यात आले नाही? सागरचा मृत्यू विजेच्या धक्क्यानेच झाला काय? त्याचा पुरावा काय? त्यावेळी सागरसोबत आश्रमातील कोण लोक होते? सागरला धामणगावच्या खासगी रुग्णालयात का नेण्यात आले, या प्रश्नांची उत्तरे तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी चौकसपणे शोधल्यास अनेक महत्त्वाच्या मुद्यांचा उलगडा होईल. उल्लेखनीय असे की, सागरसंबंधीच्या घटनेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही दुजोरा दिला आहे. त्यांच्या स्वतंत्र तपासातदेखील हीच तथ्ये पुढे आली आहेत.