लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील सातही मंडळांतील पर्जन्यमानाच्या नोंदी महसूल विभाग आणि महावेध यांच्यावतीने घेतल्या जातात. परंतु, महसूल आणि महावेध या दोहोंच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याने शेंदूरजनाघाट मंडळातील संत्राउत्पादक शेतकऱ्यांना फक्त हेक्टरी ११ हजार ७०० रुपयांचा लाभ मिळाला. विमा परतावा कमी मिळाल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये असंतोष आहे.कमी पावसाची नोंद असतानाही शेतकऱ्यांना नोंदीनुसार विम्याच्या रकमेत कपात करण्यात आली. यामुळे सदर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तक्रार करून महसुली पर्जन्यमापक यंत्रामध्ये झालेल्या नोंदीनुसार विमा रक्कम देण्याची मागणी केली आहे.पुनर्रचित हवामान आधारित संत्रा मृग बहार पीक विमा योजना २०१९ मध्ये राज्यातील १२ जिल्हे समाविष्ट आहेत. योजनेनुसार, १५ जून ते १५ जुलै दरम्यान पावसाची नोंद घेऊन १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस असल्यास ३८ हजार ५०० रुपये विमा परतावा, तर १२४ ते १५० मिमीपर्यंत पाऊस असल्यास ११ हजार ७०० रुपये लाभ देण्यात येतो. जिल्ह्याच्या काही तालुक्यांतील महसूल मंडळांमधील शेतकºयांना महसूल विभागाकडून घेतलेल्या पावसाच्या नोंदी व महावेधने घेतलेल्या नोंदीचा तफावतीचा फटका बसला. यामध्ये दुष्काळाचा डबल ट्रिगर असताना, सिंगल ट्रिगरला देय रक्कमच विमा कंपनीकडून देण्यात आली.वरूड ताुलक्यातील शेंदूरजनाघाट मंडळात १५ जून ते १५ जुलै दरम्यान केवळ ४३ मिमी पावसाची नोंद असताना, विमा कंपनीच्या महावेध (स्कायमेट) मध्ये ही नोंद १३९.०५ मिमी आहे. १५ जुलैपर्यंत पेरण्यासुद्धा झालेल्या नव्हत्या. कोरड्या दुष्काळाचे सावट होते. बजाज अलायन्स या विमा कंपनीने ऑनलाइन उपलब्ध असलेली आकडेवारी ग्राह्य धरली. त्यामुळे विमा परतावा हेक्टरी ३८ हजार ५०० रुपये ऐवजी फक्त ११ हजार ७०० रुपये देण्यात आला.शेंदूरजनाघाट मंडळातील संत्राउत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. महसूल विभागाकडील पर्जन्यमान नोंद ही अधिकृत आहे. त्याआधारे उर्वरित प्रत्येकी २६ हजार ८०० रुपयांची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी विवेक फुटाणे, अमित फरकाडे, संजय येवले, शंकर बेलसरे, शिवनारायण अढाऊ, सारंग गणोरकर, तेजस बेलसरे, प्रकाश कुबडे, किशोर बेलसरे आदींनी केली आहे.
मृग बहराच्या विमा परताव्यात तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST
शेतकऱ्यांना फक्त हेक्टरी ११ हजार ७०० रुपयांचा लाभ मिळाला. विमा परतावा कमी मिळाल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये असंतोष आहे. कमी पावसाची नोंद असतानाही शेतकऱ्यांना नोंदीनुसार विम्याच्या रकमेत कपात करण्यात आली. यामुळे सदर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तक्रार करून महसुली पर्जन्यमापक यंत्रामध्ये झालेल्या नोंदीनुसार विमा रक्कम देण्याची मागणी केली आहे.
मृग बहराच्या विमा परताव्यात तफावत
ठळक मुद्देजुलैमध्ये १३९ मिंमी पाऊस? : संत्राउत्पादकांना मिळाला अत्यल्प निधी