शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या मुदतवाढीचा संभ्रम

By admin | Updated: June 9, 2014 23:20 IST

जिल्ह्यातील ९ नगरपरिषद अध्यक्षांचा कार्यकाळ २८ जून २0१४ रोजीसंपत असल्याने जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी निवडणुकीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव स्वाक्षरीसाठी जिल्हाधिकार्‍यांसमोर सादर करण्यात

गजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यातील ९ नगरपरिषद अध्यक्षांचा कार्यकाळ २८ जून २0१४ रोजीसंपत असल्याने जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी निवडणुकीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव  स्वाक्षरीसाठी जिल्हाधिकार्‍यांसमोर  सादर करण्यात आला आहे. दरम्यान आचारसंहितेमुळे विकास कामे होऊ शकली नसल्याने मुदतवाढीची मागणी नगराध्यक्षांनी केली आहे. मुदतवाढीचा प्रस्ताव तूर्तास मुख्यमंत्र्यांच्या दालनात आहे.मुदतवाढ की निवडणूक या विषयीचा निर्णय न झाल्याने संभ्रम कायम आहे. मंगळवार  १0 जूनला हा तिढा सुटण्याची शक्यता दिसून येत आहे.राज्यामधील नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ २६, २७ व २८ जूनला संपत आहे. या पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनातील नगरप्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत आहेत. या नगराध्यक्षांना मुदतवाढ मिळाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात शासनाचे या संदर्भात कुठलेच आदेश नसल्याचे अमरावती जिल्हा नगरप्रशासन अधिकारी तडवी यांनी सांगितले. जिल्ह्यात चार महिने लोकसभेची आचारसंहिता होती, हे येथे विशेष.