शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक नळातून निघाली मृत पाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2016 00:34 IST

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी प्रभागातील गटरमलपुऱ्यात सार्वजनिक नळातील पाण्यातून शुक्रवारी सायंकाळी मृत सडलेली पाल बाहेर आली.

जुळ्या शहरातील घटना : नागरिकांचे आरोग्य धोक्यातपरतवाडा : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी प्रभागातील गटरमलपुऱ्यात सार्वजनिक नळातील पाण्यातून शुक्रवारी सायंकाळी मृत सडलेली पाल बाहेर आली. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून हा सार्वजनिक नळ असून दस्तूरखुद्द नगराध्यक्षांचा हा वॉर्ड आहे, हे विशेष. परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहराला चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेवरुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र जुळ्या शहरातील सार्वजनिक व घरगुती नळाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला ठिकठिकाणी गळती आहे. लिकेजच्या नावावर लाखो रुपयांचा दुरुस्ती खर्च नगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येतो. मात्र परिस्थिती जैसे थेच आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील गटरमलपुरा परिसरात सार्वजनिक नळ आहे. त्या नळावर नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी हाशम खान हे गेले होते. त्यांना अत्यंत गढूळ पाणी येत असल्याची जाणीव झाली. त्यांच्या पाणी भरण्याच्या भांड्यामध्ये अचानक काहीतरी पडल्याचा भास त्यांना झाला. त्यांनी निरीक्षण केले असता नळातून मृतावस्थेत सडलेली पाल आल्याची खात्री झाली. पाण्यातून दुर्गंधीदेखील येत असल्याने काहींना ओकारी झाली. हाशम खान यांनी ही बाब उपस्थित काही नागरिकांना सांगितली. हेमचंद चंदेल चांद खॉ पिंटू चंदेल, गणेश पाटील आदींनी पालिका प्रशासनाला याची माहिती दिली. यापूर्वी अचलपुरात सार्वजनिक नळातून कुत्र्याचे मांसाचे तुकडे आले होते. (प्रतिनिधी)