शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

२२ सप्टेंबरला ' दिवस व रात्र ' समान; खगोलशास्त्रीयदृष्ट्या 'विषुवदिन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 17:58 IST

Amravati News येत्या २२ सप्टेंबरला दिवस व रात्र हे समान काळाचे राहणार आहेत. खगोलशास्त्रात अशी घटना वा स्थिती ही विषुवदिन म्हणून ओळखली जाते. 

ठळक मुद्देपृथ्वीच्या परांचन गतीमुळे या दिवशी थोडा फरक पडणार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : येत्या २२ सप्टेंबरला दिवस व रात्र हे समान काळाचे राहणार आहेत. खगोलशास्त्रात अशी घटना वा स्थिती ही विषुवदिन म्हणून ओळखली जाते. ('Day and night' are smae on September 22; Astronomically 'Equinox')

 

दर वर्षाला पृथ्वीवर २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजे समान असतात. या विशेष तारखांना खगोलशास्त्रात 'विषुव दिन' असे म्हणतात. दिवस व रात्र नेहमी लहान मोठे असतात. दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलण्यामुळे निर्माण होते. पृथ्वीचा अक्ष हा २३.५ अंशाने कललेला आहे. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस १२ तासापेक्षा मोठा व रात्र १२ तासापेक्षा लहान असते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस व रात्र समान असते. म्हणजेच १२-१२ तासांचे असते.

पृथ्वीच्या परांचन गतीमुळे या दिवसात दर वर्षाला थोडा फरक पडू शकतो २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो. दोन्हीही गोलार्ध सूर्यापासून समान अंतरावर असतात. या दोन्ही दिवशी प्रकाशवृत्त उत्तर व व दक्षिण ध्रुवातून जाते, म्हणून २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजे समान असतात. आकाशात वैषुविक आणि आयनिक वृत्तांचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एका बिंदूतून २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो त्याला वसंत संपात बिंदू असे म्हणतात. तर त्याच्या विरुद्ध बिंदूत २२ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो . त्याला शरद संपात बिंदू असे म्हणतात.

खगोलप्रेमी, भूगोल अभ्यासकांना पर्वणी

खगोलप्रेमी अथवा भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी २२ सप्टेंबर या दिवस व रात्रीचे प्रत्यक्ष कालमापन करावे आणि या दिवसाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

टॅग्स :scienceविज्ञान