शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

सोशल मीडियाचा अभ्यासासाठी उपयोग करणारी दापोरी जि.प. शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

सातपुडा पर्वतरांगेच्या पायाथ्याशी असलेल्या या शाळेत केजी ते ७ वीपर्यंत प्रवेश आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पटसंख्या टिकविणारी, अशी या शाळेची नोंद आहे. लोकसहभागातून शाळेचा चेहरा-मोहरा बदलविण्यात आला असून, आज २३५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. डिजिटल वर्गखोल्या, शालेय साहित्य मूल्याधिष्ठित शिक्षण, भांडार, आयडीआय टॉवर, सुसज्ज संगणक कक्ष, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी, ‘डे टू डे’ पाढे पाठांतर, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप : डिजिटल वर्ग खोल्या, मूल्याधिष्ठीत शिक्षण, इझी स्पिक इंग्रजी उपक्रम, शालेय परसबाग, विद्यार्थी सहकार बचत बँक, लोकसहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांना पुस्तिकी ज्ञानासह अद्ययावत शिक्षणाचे धडे मिळावे, यासाठी सोशल मीडियाचा अभ्यासासाठी उपयोग केला जातो. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी असा विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करणारी मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा जिल्ह्यात एकमात्र ठरलीे.सातपुडा पर्वतरांगेच्या पायाथ्याशी असलेल्या या शाळेत केजी ते ७ वीपर्यंत प्रवेश आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पटसंख्या टिकविणारी, अशी या शाळेची नोंद आहे. लोकसहभागातून शाळेचा चेहरा-मोहरा बदलविण्यात आला असून, आज २३५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. डिजिटल वर्गखोल्या, शालेय साहित्य मूल्याधिष्ठित शिक्षण, भांडार, आयडीआय टॉवर, सुसज्ज संगणक कक्ष, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी, ‘डे टू डे’ पाढे पाठांतर, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. बहुतांश पालक खासगीऐवजी याच शाळेत पाल्यांना प्रवेश देतात. त्यामुळे दरवर्षी पटसंख्या वाढत आहे. शाळेच्या आर्कषक भिंती व बोलका परिसर, परस बाग, विद्यार्थ्यांना बचतीचे धडे, सुसंस्काराचे शिक्षण मिळत आहे. शाळेला खरी भरारी लोकसहभागातून मिळाली आहे. शालेय साहित्य भंडार हे विद्यार्थी सांभाळतात. शाळेत अद्यावत शिक्षणासाठी विविध साहित्य हाताळण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे. दापोरी येथील शाळेने राबविलेले उपक्रम बघण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत नरखेड शाळेच्या शिक्षकांनी २० फेब्रुवारी रोजी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ग्रामस्थांना आपुलकीदापोरी येथील शाळेबाबत ग्रामस्थांना ‘आपली शाळा, माझी शाळा’ अशी आपुलकी आहे. लोकवर्गणीतून संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, प्रोजेक्टर, टिव्ही, डिजिटल बोेर्ड , पाणी शुद्धिकरण यंत्र व अन्य पायाभूत सुविधा पुरविल्या आहेत.कार्यानुभव तासिकेतील श्रमप्रतिष्ठा, मूल्य जोपासता यावे, यासाठी विद्यार्थ्यांनी परसबाग फुलवली आहे. परसबागेत वाफे तयार करणे, बिजारोपण करणे, रोपांची काळजी घेणे, पाणी देणे आदी बाबी स्वत: विद्यार्थी करतात. परसबागेतून खिचडीसाठी भाजीपाला उपलब्ध होतो.पारंपरिक शिक्षणाला फाटाशाळेत पारंपरिक शिक्षण पद्धतीला फाटा देत ‘ए’ फॉर अ‍ॅपल न शिकविता अटलबिहारी, तर ‘बी’ फॉर बाबासाहेब आंबेडकर असे शिकविले जाते. वकृत्व शैलीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत आहे.शाळा विकासासाठी सरपंच, उपसंरपचांचे भरीव योगदान आहे. शिक्षकांमध्ये विद्यार्थीनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, व्यवसायनिष्ठा असली की सर्व काही सुकर होते. सुसंस्कारीत, मूल्याधिष्ठिीत पिढी निर्माण करता येते, हे शिक्षकांनी सिद्ध केले आहे. लोकसहभाग महत्वाचा ठरला.- गजानन चौधरी, मुख्याध्यापक

टॅग्स :Schoolशाळा