शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आगीत आॅईल मिल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:46 IST

शॉर्ट सर्कीटने रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत रतनगंज परिसरातील साहू बाग स्थित पंकज आॅइल मिल व शेजारचे श्री दाल अँड आॅइल मिल जळून खाक झाले.

ठळक मुद्देरतनगंज परिसरातील घटना : कोट्यवधींचे नुकसान, सहा तासांनंतर नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शॉर्ट सर्कीटने रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत रतनगंज परिसरातील साहू बाग स्थित पंकज आॅइल मिल व शेजारचे श्री दाल अँड आॅइल मिल जळून खाक झाले. अग्निशमन दलाने सहा तास अथक परिश्रम घेऊन आग नियंत्रणात आणली. आगीत कोट्यवधीच्या नुकसानाचा अंदाज व्यक्त होत आहे.रतनगंज परिसरात जवळपास चार हजार चौरस फूट जागेत अजय चौधरी यांची पकंज आॅइल मिल आहे. त्याच्या शेजारी श्री दाल अँड आॅइल मिल आहे. या ठिकाणी सरकी तेल व ढेप तयार केली जाते. रविवारी मध्यरात्री १ वाजता दोन्ही ठिकाणी शॉर्ट सर्कीटने आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. काही वेळातच अग्निशमन अधीक्षक भरतसिंह चौव्हान यांच्या मार्गदर्शनास वलगाव रोडवरील उपकेंद्र प्रमुख सैयद अन्वर यांच्यासह फायरमन मनोज इंगोले, मनोज अंबाडकर, गोकुल मुंढे, मनीष उताणे, सुनील काकडे, तायडे, सूर्यवंशी, चालक विजू पंधरे, इम्रान खान, शोएब खा, आजने, कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन पथकाने मिलमध्ये पाण्याचा मारा केला; सरकी, ढेप व तेलामुळे आगीची भीषणचा अधिकच वाढली होती. आगीचे लोळ बाहेर पडत होते. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मिलच्या चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू ठेवला. अखेर सकाळी ६ च्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीत मिलमधील यंत्रे, सरकी ढेप, तेल व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली. त्यामध्ये कोट्यवधीच्या नुकसानाचा अंदाज व्यक्त केला आहे.