शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे २१,१९९ हेक्टरमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:15 IST

अमरावती : मान्सूनच्या दमदार आगमनानंतर १० ते १२ जुलैच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात १४ तालुक्यातील ३२८ ...

अमरावती : मान्सूनच्या दमदार आगमनानंतर १० ते १२ जुलैच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात १४ तालुक्यातील ३२८ गावांमध्ये नदी, नाल्यांना पूर येऊन २१ हजार १९९ हेक्टरमधील पिके बाधित झालेली आहे. यात भिंत पडून एकाचा मृत्यू झाला. याशिवाय ४१२ घरांची पडझड झालेली आहे.

विभागात अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात पावसाने नुकसान झाले व वशिम, बुलडाण्यात स्थिती निरंक आहे. बाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव, कोठा, जोडमोहा, दारव्हा, चिखली, मांगकिन्ही, बोरी, लालखेड, महागाव, तिवरी, कलगाव, आर्णी, जवळा, लोणबेहळ, अंजनखेड, गणेशपूर, शिबला, पाटनबोरी, व मालखेड मंडळांमधील १२० गावांमध्ये पावसाने नुकसान झालेले आहे. यामध्ये २८० घरांचे अंशत: नुकसान झाले. ७,९४३ हेक्टर क्षेत्रातील पिके खरडल्या गेलेली आहे. याशिवाय १२ जुलैच्या पावसाने नेर तालुक्यातील मालखेड मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने ८६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अकोला जिल्ह्यात मुर्तिजापूर तालुक्यातील १५ गावांमध्ये ६ घरे व २५ हेक्टरमधील पिके, अकोट तालुक्यातील १२ गावाममध्ये एक घराचे नुकसान व ११० हेक्टरमधील पिके, तेल्हारा तालुक्यात ३ गावांध्ये तीन घरे, बाळापूर तालुक्यातील कासारखेडमध्ये ९ वर्षांचा बालकाचा भिंत कोसळून व बटवाडी येथे एका बैलाचा वीज पडून मृत्यू झालेला आहे.

बॉक्स

अमरावती जिल्ह्यात १६६ गावे बाधित

अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले. जिल्ह्यातील १६६ गावे बाधित झाली. यामध्ये दर्यापूर तालुक्यात ११५ घरांचे अंशत: नुकसान झाले, तर १२,६६० हेक्टरमधील पिके खरडून गेली. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १२ गावे बाधित झाली व सात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. ७४ हेक्टरमधील पिके खरडून गेली व ३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.