शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील डेअरी फार्म पुनर्जीवित होणार

By admin | Updated: November 14, 2016 00:14 IST

नापिकी, सततच्या दुष्काळाने विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याच्या पशू संवर्धन ...

सर्वेक्षण : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनाअमरावती : नापिकी, सततच्या दुष्काळाने विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याच्या पशू संवर्धन विभागाने मरणासन्न शेळी, मेंढी पालन केंद्र पुनर्जिवित करण्याचा निर्णय घेतला आहे. डेअरी फार्ममधून दुग्धगंगा वाहण्यासाठी जिल्ह्यात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.जिल्ह्यातील पोहरा व धारणी येथे शेळी, मेंढी, गाय, म्हशी पालन केंद्र आहे. यापैकी तीन पशुपालन केंद्र बंद पडले आहे. या तीनही बंद पडलेल्या पशुपालन केंद्रातील कर्मचारी अन्य ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे. मात्र विदर्भात पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत दुग्धगंगा वाहिली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने डेअरी फार्म पुनर्जिवित करण्याचे निश्चित झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीसोबत जोडधंदा हा दुधाचा असून तोच प्रयोग जिल्ह्यात राबविण्याचा निश्चय शासनाचा आहे. एक डेअरी फार्म पुनर्जिवित करण्यासाठी १७ ते १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याअनुषंगाने सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. डेअरी फार्म पुनर्जिवित करण्याची जबाबदारी अकोला येथील पशुधन विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना दुधाळू गुरांचे वाटप केले जाईल. शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्यासाठी अद्ययावत दूध संकलन केंद्र साकारले जाणार आहेत. येत्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात दुग्धगंगा वाहिली पाहिजे, यासाठी शासनकर्ते सकारात्मक पावले उचलत आहेत. तसेच बंद पडलेले तीन डेअरी फार्म विकसित केले जाणार आहे. पशुधन विकास महामंडळाला डेअरी फार्म विकसित करण्यासह शेतकऱ्यांना दुधाळू जनावरांचे वाटप करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना गुरे वाटप करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना दुधाळू गुरे वाटप करण्यात आलीत त्या शेतकऱ्यांकडून चांगल्या दरात दूध खरेदी करण्याचेही प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)