शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

डाळींचा भडका, ग्राहकांना तडका

By admin | Updated: April 24, 2017 00:49 IST

उन्हाळ्यामुळे डाळींना मागणी वाढली आहे. वाळवणाचे विविध पदार्थ तयार करण्यासाठी गृहिणींकडून हरभरा, उडीद व मूंग डाळींना पसंती दिली जाते.

फटका : शेतमालाच्या तुलनेत डाळींचेच भाव अधिकअमरावती : उन्हाळ्यामुळे डाळींना मागणी वाढली आहे. वाळवणाचे विविध पदार्थ तयार करण्यासाठी गृहिणींकडून हरभरा, उडीद व मूंग डाळींना पसंती दिली जाते. त्यामुळे वाढत्या मागणीवरून डाळींच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. परिणामी ग्राहकांना तडका बसला आहे.चालू महिन्यात हरभरा डाळीच्या दरात प्रतीकिलोमागे २० रुपयांनी किरकोळ बाजारात वाढ झाली आहे. उडीद डाळीचे भावही प्रतिकिलोमागे १५ रुपयांनी वाढले आहे. हरभरा डाळ थेट ९० ते ९५ रुपये किलो, तर उडीद डाळ १०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. यामुळे डाळींच्या बाजारात आलेली तेजी नागरिकांना थक्क करणारी आहे. घाऊक बाजारात हरभरा डाळ ८० रुपये प्रतिकिलोने विक्री होत असून, किरकोळ दर तेजीत आले आहे. नवीन हरभरा बाजारात येताच डाळींच्या दरात वाढ होणे अपेक्षित मानले जात आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने हरभरा पिकाचे उत्पादनही दमदार झाले आहे, अशा परिस्थितीत हरभरा डाळीच्या बाजारात होणारी दरवाढ धक्कादायक मानली जात आहे. उडीद डाळीचा बाजारही तेजीत असून प्रतिकिलोचा दर थेट शंभर रुपयांवर गेला आहे. मागील महिन्यात उडीद डाळीचा दर ऐंशी ते नव्वद रुपये प्रतिकिलो होता. हरभरा डाळ ७० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात होती.एकीकडे सद्या तुरीला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र दुसरीकडे विविध डाळींचे दर दिवसेंदिवस कमी होण्यापेक्षा वाढत असल्याने सर्वसामान्यांना मात्र वाढत्या डाळीच्या भावाचा सामना करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.