शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दसरा सणापूर्वी सीताफळ बाजारपेठेत विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

यावर्षी पाऊस मुबलक प्रमाणात पडला असला तरीही संततधार पावसामुळे यंदा सीताफळाच्या झाडाला बहर कमी लागला आहे. अर्धेअधिक फळे गळून पडली आहेत. यंदा ऑगस्टमध्ये महिनाभर पाऊस पडल्यामुळे सीताफळ यावर्षी कमी असले तरी पिकण्याच्या स्थितीत आले आहे.

ठळक मुद्देसततच्या पावसाने फळगळ : चांदूर बाजारातील फळांना मागणी; नव्हाळीकडे ग्राहक आकर्षित

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : दसरा सण सुरू होण्यापूर्वी यावर्षी बाजारपेठेत सीताफळे विक्रीला आली आहेत. या नव्हाळीकडे आकर्षित होऊन फळे खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढत आहे.यावर्षी पाऊस मुबलक प्रमाणात पडला असला तरीही संततधार पावसामुळे यंदा सीताफळाच्या झाडाला बहर कमी लागला आहे. अर्धेअधिक फळे गळून पडली आहेत. यंदा ऑगस्टमध्ये महिनाभर पाऊस पडल्यामुळे सीताफळ यावर्षी कमी असले तरी पिकण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे बाजारपेठेत सीताफळ विक्रीला लवकर आले असून, २५० ते ३०० रुपये डझनप्रमाणे बाजारपेठेत विक्री होत आहे. त्यामुळे वनव्याप्त भागातील ग्रामस्थांना सीताफळापासून रोजगार मिळत आहे.सीताफळ हे आरोग्यदायी असल्याने तसेच वर्षाला एकदाच मिळत असल्याने ग्राहक त्याकडे आकर्षित होत आहेत. सीताफळाच्या झाडाला दरवर्षी जून महिन्यात, तर कधी कधी मे महिन्यातही कळ्या येत असतात. सप्टेंबर ते आॅक्टोबर या महिन्यात फळे परिपक्व होतात. परंतु, यावर्षी अधिक महिना आल्याने सर्व सण एक महिना पुढे गेले आहेत. त्यातच आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने सतत हजेरी लावली. त्यामुळे सीताफळ हे लवकरच परिपक्व झाले आहे.हिरवीगार दिसणारी फळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे सीताफळाची विक्री जोरात सुरू झाली आहे. हिरवीगार व परिपक्व सीताफळांची बाजारपेठांत एंट्री झाली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा, काजळी, बहिरम, ब्राम्हणवाडा थडी, घाटलाडकी, शिराजगाव कसबा या परिसरात सीताफळांच्या मोठ्या बागा आहेत. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना सीताफळापासून मोठा रोजगार मिळत आहे. या भागातील सीताफळे गोड, लज्जतदार असतात. यामुळे या भागातील सीताफळाची मागणीसुद्धा अधिक असते.

टॅग्स :Marketबाजार