शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ कॅम्प वसाहतीत कर्फ्यूसदृश स्थिती

By admin | Updated: March 28, 2015 00:04 IST

येथील चांदूररेल्वे मार्गावरील राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) कॅम्प वसाहतीत बिबट्याच्या

अमरावती : येथील चांदूररेल्वे मार्गावरील राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) कॅम्प वसाहतीत बिबट्याच्या दहशतीने कर्फ्यूसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सायंकाळी सहा वाजतानंतर वसाहतीमधील घरांचे दरवाजे, खिडक्या आपसूकच बंद होतात. मागील १५ दिवसांपासून हा प्रकार सुरु असून १२०० कुटुंब दहशतीत वावरत आहेत.जातीय दंगल, संकटकालीन परिस्थिती, कर्फ्यू लागल्यास कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी एसआरपीएफचे जवान धावून येतात. मात्र, एसआरपीएफच्या जवानांना एका बिबट्याच्या दर्शनाने जेरीस आणून त्यांना दहशतीत जगण्यास भाग पाडल्याचे दिसून येत आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून दक्षिण वडाळी बीटमधून एसआरपीएफ पाचशे क्वॉटर्सच्या श्रेष्ठता पार्कमधून बिबट व छाव्याचे दर्शन वसाहतीतील कर्मचाऱ्यांना होत आहे. या बिबट्याच्या दर्शनाने एसआरपीएफ क्वॉटर्समधील कर्र्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील नूर हरपला आहे. श्रेष्ठता पार्कमध्ये कर्मचारी लहान मुले कुटुंबीयांसह बागडण्याला जातात. परंतु बिबट्याच्या दहशतीने या संपूर्ण परिसरात हल्ली शुकशुकाट बघावयास मिळत आहे. वनविभागाचे 'सर्च आॅपरेशन'बिबट्याच्या शोधार्थ गुरुवारी मध्यरात्री वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 'सर्च आॅपरेशन' राबविण्यात आले. रात्री अडीच वाजेपर्यंत चाललेल्या या मोहिमेत काहीही हाती लागले नाही. बिबट्याच्या येणाऱ्या प्रमुख मार्गावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या आदेशानुसार वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे यांच्या मार्गदर्शनात वनपाल विजय बारद्धे, विनोद कोहळे, वनरक्षक बापुराव खैरकर, दिलीप पळसोदकर, अश्विन महल्ले, ठाकूर, अनुप साबळे, अमोल गावराने, इकबाल शेख, सतीश उमक, निरंजन राठोड आदींनी बिबट्याच्या शोधमोहिमेत रात्र घालवली. 'रेस्क्यू आॅपरेशन'ची चमू सोबत होती.