नागपूर नागरी बँकेची कारवाई : गुलशन मार्केटमधील कार्यालय सीललोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोटींच्या थकीत कर्जामुळे ‘खोडके अग्रो एनर्जी प्रा.लि. व खोडके कॉम्प्युटर्स’ ही मालमत्ता मंगळवारी जप्त करण्यात आली. नागपूर नागरी सहकारी बँकेमार्फत ही कारवाई करण्यात आली असून बँक अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकासमोरील ‘खोडके कॉम्प्युटर’स्थित एका कार्यालयाला सील लावले. ‘खोडके अग्रो एनर्जी प्रा.ली’मध्ये प्रशांत विनायक खोडके, सुचिता प्रवीण खोडके, मीना प्रवीण खोडके, मिलिंद चंद्रकांत काकडे यांची भागिदारी असून त्यांनी ‘खोडके अॅग्रो एनर्जी’ या कंपनीसह अन्य व्यवसायासाठी त्यांची काही मालमत्ता गहाण ठेवून नागपूर नागरी सहकारी बँकेच्या अमरावती शाखेतून सन २०१० साली ४ कोटी ४५ लाखांचे कर्ज उचलले होते. रेल्वे स्थानकासमोरील गुलशन मार्केटमधील कार्यालय, एमआयडीसीतील फॅक्टरी व एनर्जी प्लान्ट असे गहाण मालमत्तेचे स्वरूप आहे. मात्र, कर्जाची उचल केल्यानंतर त्यांनी परतफेड न केल्यामुळे बँकेमार्फत कर्जवसुलीच्या ‘सरफेसी अॅक्ट २००२’ कायद्यांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली. कलम १४ नुसार बँक अधिकाऱ्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पत्र दिले होते. त्यानुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ७ मार्च २०१७ रोजी आदेश काढून मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली. जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेशअमरावती : या कर्जावरील व्याज थकबाकीमुळे ही रक्कम ७ कोटी १९ लाख ८८ हजार ७५१ रूपयांपर्यंत गेली. यासोबतच मार्च २०१५ पर्यंत १५.५० टक्के व्याजासह ही रक्कम अंदाजे १० कोटींच्या घरात जात असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली. मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी मंगळवारी नझूल विभागाच्या तहसीलदार आडे यांच्यासह बँक अधिकारी मोहन शाह, मिटकॉन अधिकारी अमित नायडू यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकासमोरील गुलशन मार्केटमध्ये जाऊन ‘खोडके अॅग्रो एनर्जी’कार्यालयाचा ताबा घेतला. कार्यालय सील करून भिंतीवर मालमत्ता ताब्यात घेतल्याची नोटीस लावण्यात आली. यावेळी शहर कोतवाली पोलीस ठाण्याचे पीएसआय आर. लेवटकर यांच्यासह अन्य पोलीस ताफा सरंक्षणाच्या दृष्टीने उपस्थित होता. खोडके अॅग्रो एनर्जी’च्या भागिदारांनी उचल केलेल्या ४ कोटी ४५ लाखांच्या कर्जाचा भरणा न केल्यामुळे नागपूर सहकारी बँकेमार्फत त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. व्याजासह ही रक्कम सुमारे १० कोटींच्या घरात आहे. - मोहन शाह, बँक अधिकारी
कोटींचे कर्ज थकित खोडकेंची मालमत्ता जप्त
By admin | Updated: May 24, 2017 00:05 IST