गजानन मोहोड - अमरावतीराष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना जिल्ह्यात खरीप २०१४ हंगामासाठी राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने नुकताच घेतला. कापूस, सोयाबीन, उडीद व मूग या पिकांना विम्याचे संरक्षण कवच लाभणार आहे. यासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव सादर करावे लागणार आहे. १ एप्रिल २०१४ पासून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची करण्यात आली. विम्याचा हप्ता परस्परच बँक खात्यावर जमा केली जात असल्याने शेतकऱ्यांचा शेष आहे. मात्र बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक असणार आहे. पावसाचा लहरीपणा व नैसर्गिक आपत्ती या हवामान घटकाच्या धोक्यामुळे संरक्षण देणारी हवामान आधारित ही योजना आहे. जिल्ह्यात पथदर्शक स्वरूपात व अधिसूचित महसूल मंडळ स्तरावर क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अमरावती विभागातील अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी द्वारा कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकासाठी ही विमा योजना राहणार आहे.
पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची
By admin | Updated: June 16, 2014 23:15 IST