शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा उतरला कागदावरच

By admin | Updated: July 12, 2014 00:38 IST

राज्यातील काही जिल्ह्यांत हवामानावर आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली.

अमरावती : राज्यातील काही जिल्ह्यांत हवामानावर आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली. या योजनेत त्रुटी असल्यामुळे यावर्षी राज्यभर राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. सोयाबीनसह १६ पिकांसाठी ही योजना आहे. मात्र नुकसान भरपाई निश्चित करण्याचे निकष बदलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन भरपाई देण्यात येणार आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०१४-१५ या वर्षासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना राबवण्यात परवानगी दिली आहे. या योजनेचा कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना आपला विमा प्रस्ताव संबंधित बँकेत सादर करावा लागणार आहे. उपपिकासाठी ८० टक्के आणि सोयाबीन, कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ, सूर्यफूल, कांदा, बाजरी धान, मका, नाचनी या पिकांसाठी ६० टक्के नुकसान ग्राह्य धरले जाणार आहे. या जोखीम स्तरानुसारच मदतीचे वाटप होईल, असे अध्यादेशात म्हटले आहे. अल्प व अत्यल्प भुधारकांना योजनेत १० टक्के अनुदानाची विशेष सवलत दिली आहे. २०१३ मध्ये पिक विमा योजनेत राज्यभरातील १४ लाख शेतकऱ्यांना ८७ कोटी ८६ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. मागील वर्षी चुकीच्या निकषामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. फळबागांसाठी हेक्टरी ३६०० रुपयांचा विमा आहे. शेतकरी आणि राज्य शासनाचे प्रत्येकी ३६०० रुपये असा ७हजार २०० रुपयाचा विमा आहे. पावसात, गारपिटीत नुकसान होऊनही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. गारपीटग्रस्तांसाठी निधी मिळाला; मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत फळबागधारकांना पंचनाम्यात बाद केल्याचा आरोप अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी पिंकाचा आणि फळबागांचा विमा उतरविल्यानंतर वेगवेगळ्या निकषात त्यांना डावलण्यात येते. त्यामुळे विमा कंपन्या आणि बँकाचा फायदा झाला अशी ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.