महिन्याचा अर्थव्यवहार : अनधिकृत आर्थिक व्यवहारात गुरफटले लहान मोठे व्यापारीगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात सर्वत्र लिलाव पध्दतीने भिसीचे व्यवहार सुरू आहे. कधी ‘ड्रॉ’ पध्दतीनेही भिसी काढण्यात येते. बँकापासून दूर राहत काही मंडळी समांतर अशी अर्थव्यवस्था चालवित आहेत. पूर्णत: अनाधिकृत असलेला हा आर्थीक व्यवहार कायद्याचे नियंत्रण नसल्यामुळे प्रत्येक गावात राजरोसपणे सुरू आहे. याच्या कचाट्यात लहान-मोठे व्यापारी अडकले आहे. बेकायदेशीर परंतु प्रतिष्ठेच्या असलेल्या मोहजाळात केवळ भिसी चालकच मालामाल होत असून सदस्य मात्र कंगाल होत आहेत. गावागावात ठराविक सदस्य समसमान रक्कम जमा करतात. जेवढे सदस्य तेवढेच हप्ते असे साधे समिकरण असले तरी नंतर लागला नसताना कमी भावात भिसी द्यायच्या प्रकारात भिसी सदस्याला मात्र मोठे नुकसान सहन करावे लागते. लकी ड्रॉ प्रकारे काढण्यात आलेल्या भिसीला हल्ली व्यावसायिक स्वरुप आले आहे. कुठलाही कर नाही, कायद्याचे बंधन नाही. झालेला व्यवहार ग्रुपच्या बाहेर जात नाही, अशा प्रकारच्या भिसीचे १००० ते लाखोंच्या घरात आर्थिक व्यवहार चालत आहे. हा पैशाचा एक प्रकारे काळाबाजार व समांतर अशी अर्थव्यवस्था चालविण्याचा प्रकार आहे. भिसीचालक पैसे गोळा करण्याचे कमीशनमध्ये महिन्याला लाखो रुपये कमवित आहेत. परंतु आर्थिक अडचणीत कमी पैश्यात घेतलेली त्या महिन्याची भिसी ही त्या सदस्याला कंगाल बनवित आहे. व त्या बदल्यात त्याच्याकडून दरमहा वसूल केलेली जाणारी याचा जर ताळेबंद केला तर धक्कादायक आर्थिक शोषनाचा प्रकार समोर येतो. या प्रकारात अनेकदा भांडनही होतात. पोलिसात तक्रार देखील करण्यात येते. परंतु पोलीसव्दारा कारवाई होत नाही, ती भांडन केल्याची, भिसी व्यवहारावर कुठलीही कारवाई होत नाही, गावागावात हे प्रकार बिनदिक्कत सुरू आहे. याला आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.काय आहे भिसी?भिसी म्हणजे असा एक ग्रुप जो ठरावीक रक्कम ठरावीक कालावधीत जमा करतो. भिसीचे जेवढे सदस्य असतात, तेवढेच हप्ते असतात. ही भिसी काही ग्रुप ‘लकी ड्रॉ’ तर काही मोठ्या ग्रुपमध्ये लिलाव पध्दतीने काढली जाते. भिसीचालक फरार झाल्याच्या घटनाया आर्थिक व्यवहारात अनेक ठिकाणी भिसीचालक व सदस्य यांच्यात वादही होतात. भिसीची रक्कम मिळाल्यानंतर बऱ्याचदा जो सदस्य रक्कम देण्याचे टाळाटाळ करतो, अनेकदा ग्रुपमधील एखाद्या सदस्याची आर्थिक स्थिती खराब होते व तो पुढील हप्त देण्याचे टाळाटाळ करतो. भिसीचालकास केवळ हप्ता हवा असतो, यासाठी त्याचा तगादा असतो. अनेक सर्व सदस्यांची रक्कम गोळा करुन भिसीचालक फरार होतो. त्या बेकायदेशीर प्रकारात पुरावाच नसल्याने व कायद्याचे नियंत्रण नसल्याने पोलिसात तक्रार होत नाही. भिसी चालकाचा पहिला नंबरभिसी ग्रुपमध्ये जो सर्व सदस्यांकडून रक्कम जमा करण्याची हमी घेतो, तो भिसीचालक असतो. ज्या सदस्याला भिसीचा क्रमांक लागला आहे. त्याच्यापर्यंत सर्व रक्कम पोहचवून देण्याची जबाबदारी त्याची असते. व याचा मोबदला म्हणून या अर्थाने भिसीचा पहिला क्रमांक शोधतो. काही पंधरवडी, तर काही महिन्यांचीकाही भिसी ग्रुपमध्ये १५ दिवसांनी तर काही ग्रुपमध्ये एक महिन्यांनी ड्रॉ काढण्यात येतो. ज्या सदस्याला ड्रॉ लागला त्या सदस्याला रक्कम दिली जाते. अशाप्रकारच्या भिसीमध्ये मात्र दरमहा समान हप्ता जमा करणे, बंधनकार आहे. जेवढे सदस्य तेवढेच ड्रॉ काढल्या जातात. दोन प्रकारात चालविली जाते भिसीलिलाव आणि ड्रॉ अशा दोन प्रकारात भिसी व्यवहार चालतो. लिलाव पध्दतीत सर्व सदस्य एकत्र जमून बोली बोलतात. सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीस भिसी दिल्या जाते. ही भिसी लाखोंच्या घरात आहे. भिसी चालकाचा विश्वासही महत्त्वाचाभिसीमध्ये मोठा ग्रुप असतो. ते सर्व सदस्य एकमेकांना ओळखतात असे नाही. परंतु ते भिसी चालकाचा ओळखतात, त्याची गावातील पत व विश्वास महत्त्वाचा असतो. एखाद्याने जर हप्ता दिला नाही तो स्वत: त्याची भरपाई करुन विश्वास संपादतो व कमिशनमधून याची भरपाई करतो. लिलाव पध्दतीत कमिशन विभागणीलिलाव पध्दतीमध्ये जवेढ्याची बोली बोलल्या जाते. तेवढी रक्कम त्याला देण्यात येवून उर्वरित रक्कम सर्व सदस्यांमध्ये विभागणी केली जाते. यामध्ये भिसीचालकाचे ३ टक्के कमिशन असते.चिठ्ठीने व्यवहारलकी ड्रॉ पध्दती महिला वर्गात जास्त प्रमाणात चलनात आहे. यामध्ये सदस्याच्या नावाच्या चिठ्या टाकण्यात येतात ज्याची चिठ्ठी निघाली त्याला त्या महिन्याची भिसी मिळते. पुढच्या ड्रॉ मध्ये त्याची चिठ्ठी टाकण्यात येत नाही. समान दिनशेन, समान वेगाने व समान चालनारी असंवैधानिक गतिविधी म्हणजे समांतर अर्थव्यवस्था, परंतु भिसीप्रकारात समांतर अर्थव्यवस्थेपेक्षा एकाप्रकारे अवैध सुरू असलेली व कायद्याचे नियंत्रण नसलेली सावकारी आहे. -धनंजय काळे, अर्थतज्ज्ञ
भिसीतून कोट्यवधींची उलाढाल
By admin | Updated: April 29, 2015 00:18 IST