शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी अडवणूक केल्यास बँकांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

खरीप हंगाम नियोजनाची बैठक ना. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात घेण्यात आली. बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देपालकमंत्री : खरीप हंगाम आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप पीक हंगामात पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. सद्यस्थितीचे गांभीर्य ओळखा. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी आल्यास खपवून घेतले जाणार नाही. कर्जवाटपात हयगय केल्याचे आढळल्यास बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिले.खरीप हंगाम नियोजनाची बैठक ना. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात घेण्यात आली. बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते.तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुका समित्यांनी प्रभावीपणे देखरेख, पाठपुरावा करावा. बियाणे, युरिया खतांचा पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. त्याची कृत्रिम टंचाई होता कामा नये. कृत्रिम टंचाई किंवा ब्लॅक मार्केटिंगचा एकही प्रकार आढळता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.महावितरण विभागाकडून अनुपालनात दिरंगाई असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. वीजपुरवठा, नवीन वीज जोडणी ही कामे गतीने झाले पाहिजेत. डीपी बसविण्याच्या कामात दिरंगाई व अपप्रकार घडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. पाणीपुरवठा योजनांची कामेही तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.नियोजनाची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहोचवाकाही भागात एका कंपनीचे बियाणे निकृष्ट असल्याने पिकाचे नुकसान झाल्याची शेतकºयाची तक्रार आहे. त्याबाबत नुकसानभरपाईबाबत अहवाल पाठविण्यात आला. कृषी विभागाचे नियोजन, निविष्ठा उपलब्धता, योजना, उपक्रम, पीक मार्गदर्शन याची स्थानिक संदर्भांसह माहिती शेतकरी बांधवांपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचली पाहिजे. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून यासाठी गावोगाव माहिती, मार्गदर्शन साहित्य पोहोचावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.पोकराची अंमलबजावणी गतिमान करातालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना वेळोवेळी माहिती देऊन त्यांच्या सूचना जाणून नियोजन केले पाहिजे. पोकराच्या अंमलबजावणीची गती वाढवावी, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. ड्राय झोनमध्ये फळपीक घेण्यावर मर्यादा असते. त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या फळपिकांची लागवड अशा ठिकाणी करून तिथे फळपीक योजना राबविणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न व्हावा, असे निर्देश ना. बच्चू कडू यांनी दिले.असे आहे खरिपाचे प्रस्तावित क्षेत्रखरिपासाठी सरासरी खरीप क्षेत्र ७.२८ लाख हेक्टर आहे. लागवडीलायक क्षेत्राच्या तुलनेत त्याची टक्केवारी ९३ टक्के आहे. कपाशीचे प्रस्तावित क्षेत्र २.६१ लाख हेक्टर, सोयाबीनचे २.६८ लाख हेक्टर व तुरीचे १.१० लाख हेक्टर, तर मूग व ज्वारीचे प्रत्येकी ३० हजार हेक्टर, उडदाचे १० हजार हेक्टर, मक्याचे ९ हजार ५०० व इतर पिकांचे ९ हजार ६१२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असल्याचे एसएओ विजय चव्हाळे यांनी सांगितले. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर