शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एकवीरा पतसंस्थेच्या अध्यक्ष, संचालकासह आठ जणांवर गुन्हे

By admin | Updated: October 9, 2016 01:01 IST

तालुक्यातील एका शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरून येथील एकविरा नागरी ..

सर्व आरोपी पसार : शेत विक्री व्यवहाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्याअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील एका शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरून येथील एकविरा नागरी पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. शेत विक्रीच्या व्यवहारात खरेदीदार व दलालांनी दगाबाजी करून व्यवहाराची पूर्ण रक्कम न देता धमक्या दिल्याने दिलीप बाबाराव इंगळे (४०) यांनी ३० सप्टेंबरला आत्महत्या केली. ते येथील शहापुरा भागातील रहिवासी होते. त्यांचे मोठे बंधू विनायक इंगळे यांच्या तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. यामध्ये एकवीरा नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष व संचालकांसह तालुक्यातील इतर प्रतिष्ठितांचा समावेश आहे. येथील वैकुंठधाम स्मशानभूमित ३० सप्टेंबर रोजी दुपारी दिलीप इंगळे यांनी गळफास घेतल्यानंतर ३ आॅक्टोबर रोजी याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली. तक्रारीनुसार, दिलीप यांनी आपल्या चिंचोली बु. येथील ३ एकर ३२ गुंठे शेताचा नोव्हेंबर २०१३ मध्ये सुरेश अढाऊ रा. खिराळा यांच्याशी ३ लाख रुपये घेऊन इसार केला होता. या व्यवहारात हरिभाऊ पळसकर व गजानन मंडपे हे दलाल होते. केवळ इसारावरच खरेदीदार व दलालांनी त्यांच्या शेतीचा दोन वर्षांपासून अनधिकृतपणे ताबा घेतला होता. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी येथील एकवीरा नागरी सह बँकेचे अध्यक्ष मधुसूदन गुजर यांनी प्रभुदास गायगोले यांच्या नावाने माझा भाऊ दिलीप याला कोणताही मोबदला न देता सदर शेतजमिनीची खरेदी करून घेतली, असा आरोप मृताच्या भावाने केला आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी घरी चिठ्ठी लिहिली असून त्यात आठजर्ण त्रास देत असल्याचा उल्लेख आहे. मृताचा मोठा भाऊ विनायक इंगळे रा. गावंडगाव यांनी ३ आॅक्टोबरला पोलिसात तक्रार दिली. यावरुन सातेगाव येथील हरिभाऊ पळसकर, गजानन मंडपे, खिराळा येथील सुरेश अढाऊ, अंजनगाव येथील मधुसूदन गुजर, प्रभुदास गायगोले, लक्ष्मण गायगोले, वसीम खान व चिंचोली बु. येथील बंडू बाबनेकर यांच्याविरुद्ध भादंवि ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहेत.आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली. मात्र आरोपी आढळून आले नाही. याप्रकरणी तपास पथक नेमून तपासणी सुरू आहे.- सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक, अंजनगाव सुर्जी.