शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी कांद्याने रडविले; लागवडीचा खर्च वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST

पान २ ची लीड कांदा लागवड अंतिम टप्प्यात : तरुणाईचा कल चांदूर बाजार : तालुक्यातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात ...

पान २ ची लीड

कांदा लागवड अंतिम टप्प्यात : तरुणाईचा कल

चांदूर बाजार : तालुक्यातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात कांदा लागवड संपणार आहे. मात्र, यावर्षी लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. त्यात आता कांद्याला काय भाव मिळणार, याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड करण्यात येते. काजळी, देऊरवाडा, माधान, कोदोरी, जसापूर, पिंपरी पूर्णा, थुगाव, निंभोरा या भागांत सर्वाधिक कांदा लागवड होते. या भागात ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची शेती नाही, त्यांनीदेखील कांदा लागवडीसाठी शेती लागवणने घेतले आहे. दरवर्षी शेतकरी कांदा लागवडीसाठी ५०० ते ६०० रुपये पायलीने बीज खरेदी करतात. मात्र, यंदा कांद्या बियाणाच्या एका पायलीसाठी दोन हजार रुपये द्यावे लागले आहेत. त्यामुळे कांद्याच्या लागवड खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी यंदा कांद्याला कमीत कमी १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

देशातून कांदयाची निर्यात सुरू राहिली, तर कांद्याला अपेक्षित भाव निश्चित मिळू शकतो, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कांद्याला यंदाचा लागवडीचा खर्च ५० हजारांच्या घरात आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा झाला आहे. खत, फवारणी, रासायनिक औषधींच्या वाढलेल्या दरामुळेदेखील शेतकरी हैराण आहेत. विशेष म्हणजे, उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या तयारीत असणाऱ्या अनेक युवकांनी कांदा लागवड करून आपला कल शेतीकडे वळविला आहे.

निर्यात धोरण आडमुठे

जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कांदा होता तेव्हा शासनाने निर्यात बंद केली. जेव्हा कांदा संपला तेव्हा निर्यात सुरू करण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवड खर्च निघणेही कठीण झाले आहे. यामुळे उन्हाळी कांदा लागवडीने यंदा शेतकऱ्यांना रडू आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

-------------