शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुढाऱ्यांच्या दबावापोटी भुयारांची तडीपारी

By admin | Updated: November 7, 2016 00:08 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष देवेंद्र भुयार यांना पुढाऱ्यांच्या दबावापोटी हेतुपुरस्सर तडीपार करण्यात आले.

रविकांत तुपकर : स्थानिक नेत्यांसह एसपींवर टीकास्त्रअमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष देवेंद्र भुयार यांना पुढाऱ्यांच्या दबावापोटी हेतुपुरस्सर तडीपार करण्यात आले. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असून, भुयारांच्या तडीपारीने शेतकऱ्यांची चळवळ थांबणार नाही, असा इशारा राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी येथे दिला.देवेंद्र भुयार यांना जिल्ह्यातून तडीपार केल्याच्या पार्श्वभूमिवर रविवारी तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. भुयारांवर तडीपारी लादणाऱ्या पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची बदली करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यामागणीसाठी सोमवारी खा. राजीव शेट्टी आणि दुग्ध विकासमंत्री सदा खोत हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोरांशी चाललेली आमची लढाई या तडीपारीमुळे थांबणार नाही. आतापर्यंत बऱ्याच जणांचा माज आम्ही उतरविला आहे. वरूडमधील स्थानिक आमदारांसोबत संबंधितांची मस्ती जिरविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा घणाघाती इशाराही त्यांनी दिला. पंचायत समिती सदस्य देवेंद्र भुयार यांनी आतापर्यंत जी काही आंदोलने केलीत, ती शेतकरीभिमुख होती. जिल्ह्यातून तडीपार करावे, असा कोणताही गुन्हा वा कलम त्यांच्यावर नाही. एसपींना वाघा बॉर्डरवर पाठवाशेतकऱ्यांच्या चळवळी दडपण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षकांनी चालविला आहे. बुलडाण्यामध्येही त्यांनी तेच केले. चळवळ उभी राहू नये, अशी त्यांची मानसिकता आहे. ते जर इतकेच कर्तबगार असतील तर त्यांना वाघा बॉर्डरवर पाठविण्याची मागणी आपण सरकारकडे करू. एसपी लख्मी गौतम यांचे मानसिक संतुलन ढळले असून, ज्या पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संगणमत करून भुयारांची तडीपारी घडवून आणली त्या लोकप्रतिनिधीला त्यांनी तडीपार करण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान त्यांनी केले. लोकप्रतिनिधींची तडीपारी केव्हा ?देवेंद्र भुयार यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत ज्या स्थानिक आमदाराने पडद्यामागे भूमिका वठविली, त्यांच्यावर कलम ३०७ सह अन्य विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. सत्ता वर्तुळात असतानाही त्यांनी दोन महिन्यांपूर्वी नायब तहसीलदारांना मारहाण केली होती. त्यापूर्वीही त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यांना अटक करण्याचे धाडस पोलीस अधीक्षकांनी दाखविले नाही. एसपींनी आधी त्यांना तडीपार करावे, असे आव्हान तुपकर यांनी जिल्हाधिकारी आणि एसपींना दिले. या स्थानिक नेत्याचा सोफियामधील सहभाग जगजाहीर आहे. नाला खोलीकरणाचे कंत्राट कुणाकडे आहे. हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे वारंवार पक्षबदल करणाऱ्या या लोकप्रतिनिधीने नैतिकतेचे धडे देऊ नयेत, असेही तुपकर म्हणालेत.स्थानिक आमदाराचा हात !अमरावती : मात्र, मोर्शी-वरूडच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला भुयारांचे वाढते वर्चस्व खपले नाही व त्यांनी यंत्रणेला हाताशी धरून भुयारांचा गेम केल्याचा आरोप तुपकर यांनी केला. तडीपारीचे निकष डावलून भुयार यांचा राजकीय बळी देण्यात आला. असे झाल्यास गावागावात देवेंद्र भुयार निर्माण होतील. प्रस्थापितांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना जाब विचारण्याची ताकद भुयार यांनी उभारलेल्या चळवळीतून निर्माण झाली होती. स्थानिक आमदारांची यात महत्त्वाची भूमिका आहे.