शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक संघटना ठोठावणार न्यायालयाचे दार !

By admin | Updated: October 8, 2016 00:10 IST

चिवड्यात चक्क पाल आढळूनही अन्न प्रशासन विभागाने चिवड्याचे पाकीट, चिवडा आणि पाल पंचनामा करून ...

बोथट संवेदना : पालयुक्त चिवड्याचे अद्यापही नमुने नाही अमरावती : चिवड्यात चक्क पाल आढळूनही अन्न प्रशासन विभागाने चिवड्याचे पाकीट, चिवडा आणि पाल पंचनामा करून ताब्यात न घेतल्याने काही ग्राहक संघटनांनी आता याविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. ग्राहकांच्या हितासाठी जागरूक राहण्याचे शासनादेश असतानाही अन्न व औषधी प्रशासन विभाग ग्राहकांच्या हिताशी, आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांना बळ देतात. 'ग्राहकांना अळ्या नि अधिकाऱ्यांना काजू' अशी स्थिती यापूर्वीच 'लोकमत'ने छायाचित्रासह लोकदरबारात मांडली होती. मनभरी प्रकरणात अन्न प्रशासन अधिकाऱ्यांनी या मुद्याचा कळसच गाठला. फोन केल्यानंतरही एफडीए अधिकाऱ्यांनी फोन 'स्वीच्ड आॅफ' करून ठेवले. केवळ मनभरी उत्पादन करणाऱ्या कंपनीला पाठीशी घालण्यासाठी अधिकारी छुपे कार्य करीत आहे, अशी लोकभावना निर्माण झाली आहे. सामान्य ग्राहकांच्या हक्कासाठी जागरूक असणाऱ्या काही ग्राहक संघटनांनी या मुद्यावर एकमत करून संघर्षाची तयारी सुरू केली आहे. ग्राहकांना पुरविले जाणारे अन्न शुद्ध, स्वच्छ आणि आरोग्यदायी असावे हा त्यामागचा हेतू आहे. ग्राहक संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेले कायदेच मुळी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे अस्तित्वहीन झाले आहेत. धाक दाखवून व्यावसायिकांकडून मासिक वसुली करणे हाच केवळ अन्न व औषधी प्रशासन विभागासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा आणि अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याचा उपयोग आहे. कायद्याची अंमलबजावणी करणे हे कर्तव्य प्रशासनाचे आहे. परंतु प्रशासन त्यांच्या कर्तव्यापासून फारकत घेत ग्राहकांना मृत्यूच्या दाढेत ढकलू लागले आहे. या धोकादायक नांदी आहेत. शासन या मुद्यावर मूक आहे. सामान्यांना सुरक्षितपणे जगता यावे, यासाठी लवकरच न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.