शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत नियुक्तीसाठी नगरसेवकांची मोर्चेबांधणी

By admin | Updated: January 4, 2016 00:10 IST

महापालिकेत मलईदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीत नियुक्ती मिळावी,..

नेत्यांची मनधरणी सुरु : विद्यमान आठ सदस्य मार्चमध्ये समितीतून बाहेरअमरावती : महापालिकेत मलईदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीत नियुक्ती मिळावी, यासाठी नगरसेवकांनी नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. या सत्रातील हे शेवटचे वर्ष असून बहुतांश नगरसेवकांना स्थायी समितीत प्रवेशाचे वेध लागले आहे.विद्यमान स्थायी समितीचा कार्यकाळ ९ मार्च २०१६ पर्यंत राहणार आहे. सभापती विलास इंगोले यांच्यासह ८ सदस्यांचा नियमानुसार दोन वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने ते स्थायी समितीतून बाहेर पडतील. आठ सदस्यांची नियुक्ती फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. मात्र नवीन वर्ष सुरु होत नाही तेच नगरसेवकांनी स्थायी समितीत नियुक्तीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थायी समितीत प्रवेशासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या लांबलचक आहे. मात्र स्थायी समितीतून जेवढे सदस्य बाहेर पडतील तेवढेच सदस्य पुन्हा पाठवावे लागेल. गटनेत्यांनी दिलेल्या पत्रानुसार जे नावे देतील तेच नावे महापौर वाचन करुन स्थायी समितीचे सदस्य म्हणून पाठविले जातील. महापालिकेत स्थायी समितीला अनन्य साधारण महत्व आहे. आर्थिक विषयांचे सर्वच अधिकार या समितीला मुंबई महापालिका अधिनियमाने बहाल केले आहे. त्यामुळे महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आलेल्यांना या समितीत प्रवेशाचा मोह आवरत नाही. येत्या २०१७ मध्ये महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या सामोरे जावे लागत असल्याने नगरसेवकांना ‘फुल नाही तर फुलाची पाकळी’ मिळावी या आशेने स्थायी समितीत प्रवेशासाठी नेत्यांकडे लॉबिंग सुरु केले आहे. काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे कोणाला स्थायी समितीत पाठवावे, हे आतापासूनच पक्षनेता बबलू शेखावत यांच्यासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. तर राष्ट्रवादी फ्रंट या गटाचे नेतृत्व अविनाश मार्डीकर यांच्याकडे असली तरी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांचाच शब्द या गटासाठी प्रमाण मानला जातो. संजय खोडके ठरवतील, त्याच नगरसेवकाला स्थायी समितीत पाठविले जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी असे प्रत्येकी दोन सदस्य स्थायी समितीत नियुक्त केले जाणार आहे. भाजप, सेना, रिपाइं-जनविकास फ्रंट व बसपा असे प्रत्येकी एक सदस्य स्थायी समितीत नियुक्ती केले जातील. स्थायी समितीत आठ सदस्य नव्याने पाठवावे लागणार आहे.