शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा ‘तो’ ठराव शासनाकडून विखंडित

By admin | Updated: May 6, 2016 00:12 IST

तेराव्या वित्त आयोगातून महापालिकेला मिळालेला निधी नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख असा वितरित करावा, ...

अमरावती : तेराव्या वित्त आयोगातून महापालिकेला मिळालेला निधी नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख असा वितरित करावा, त्यानुसार कामे सुचवावित, असा महासभेने केलेला ठराव राज्य शासनाने अखेरीस विखंडित केला. २० जुलै२०१५ च्या सर्वसाधारण सभेत पारित केलेला हा ठराव विखंडित करावा, अशी विनंती महापालिका प्रशासनाकडून नगरविकास विभागाला करण्यात आली होती.१३ व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून कामे करण्यासाठी कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावर प्रशासनाने बाजू सुद्धा मांडली. मात्र प्रस्तावित कामे निश्चित न करता या निधीतून प्रत्येक नगरसेवकाला २५ लाख रुपयांचा निधी देण्यात यावा व कामे सुचवावीत, असा ठराव आमसभेने घेतला. मात्र हा ठराव शासनाच्या मार्गदर्शक तत्वात बसणारा नसल्याने रद्द करण्यात यावा, अशी विनंती महापालिका आयुक्तांनी केली होती. त्यावर गुरुवारी अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्तांच्या १२/८/२०१५ च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुलक्षून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. ६६ दिनांक २० जुलै २०१५ तात्पुरता निलंबित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने उप आयुक्त (प्रशासन) यांनी वित्त आयोगाच्या निधीतून करावयाच्या कामाची यादी तयार करून शासनास अवलोकनार्थ सादर केलेली होती व आयुक्तांनी त्यांचे अभिवेदन सादर केले. या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेच्या २० जुलै १५ ला झालेल्या महासभेने पारित केलेला ठराव क्र. ६६ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण अठ्ठावीस कलम ४५१ (३) नुसार अंतिमत: विखंडीत करण्यात यावा, असे अभिवेदन आयुक्तांनी केले होते. त्या अभिवेदनाच्या आधारे अमरावती महानगरपालिका, महासभा ठराव क्र. ६६ दि. २०/७/२०१५ हा अंतिमत: विखंडीत करण्याचा निर्णय घेण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन होता. त्या अनुषंगाने तो ठराव विखंडित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)असा आहे शासन निर्णय१३ व्या वित्त आयोगांतर्गत महापालिकांना वाटप करण्यात आलेल्या निधीचा विनियोग शासन निर्णय, नगरविकास विभाग, क्र. तेविआ-२०१०/प्र.क्र. १३१/२०१०/नवि-४, दिनांक २५ आॅक्टोबर २०१० मध्ये नमूद विहीत कार्यपद्धतीनुसारच करणे आवश्यक असल्याने अमरावती महानगरपालिका सर्वसाधारण सभेने पारित केलेले ठराव क्र. ६६ दिनांक २०/७/२०१५ हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४५१ (३) नुसार अंतिमत: विखंडित झाल्याचे मानण्यात येत आहे, असा शासन आदेश गुरुवारी नगरविकास विभागाने काढला आहे. या शासन आदेशाने प्रत्येक नगरसेवकांना २५ लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव रद्द करण्यात आला, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.