शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST

चिखलदरा : तालुक्यामध्ये आतापर्यंत ६६८३ अन्टीजेन तसेच ३३२७ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. ...

चिखलदरा : तालुक्यामध्ये आतापर्यंत ६६८३ अन्टीजेन तसेच ३३२७ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ६८३ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेले आहेत. तालुक्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व चिखलदरा व चुरणी ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण केंद्र उपलब्धतेनुसार सुरु करण्यात आले आहे.

तालुक्यात विनामास्क, मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी व सोशल डिस्टंसिंग भंग केल्याप्रकरणी १४ लोकांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासणीसाठी सेमाडोह, बिहाली, चिखलदरा, डोमा येथे या चार नाक्यांवर आरोग्य विभागाची पथके नेमण्यात आली. डोमा येथे आतंर राज्य सीमेवर पोलीस बंदोबस्तात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवून तपासण्या करण्यात येत आहेत. गावोगावी आरटीपीसीआर तपासणीचे कॅम्प लावण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी लोकमतशी बोलताना दिली.

शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना टेस्टिंग

टेंब्रुसोडा, चिखली, चिखलदरा व डोमा या ठिकाणी कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. चिखलदरा व चुरणी या ठिकाणी कोविड समर्पित रुग्णालयांची स्थापना करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आमदार निधी व इतर सामाजिक संस्थांचा हातभार लागला आहे.

प्रत्येक गावात ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

बॉक्स

कोरकू भाषेतून संवाद

तालुक्यातील दुर्गम भागात कोरकू भाषेत कोरोना संबंधी जनजागृती तसेच लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आदिवासींमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासन आता गावागावांत जाऊन जनजागृती करीत असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली. रुग्णांसाठी हेल्पलाईन उघडण्यात आल्या आहेत. गृह विलगीकरण असलेल्या नागरिकांशी आरोग्यविषयक संवाद साधण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.