शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे मृत्यू वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

जिल्ह्यात पहिल्या कोरोना संक्रमिताचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. १ जानेवारीपर्यंत ४०७, १ फेब्रुवारीला ४१७ व आता २२ मार्चला संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ही ६३५ झाली. दररोज सरासरी चार ते पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. कोरोनाला क्षुल्लक समजणे महागात पडत आहे. अंगावर दुखणे काढणे, कोरोना चाचाणी उशिराने करणे जिवावर बेतणारे ठरत आहे.

ठळक मुद्देधोक्याची घंटा, कोरोना संसर्गामुळे ५० दिवसांत २१८ दगावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्गाचा आलेख अलीकडे माघारला असताना रुग्णांच्या मृत्युसंख्येत झालेली वाढ धक्कादायक आहे. १ फेब्रुवारी ते २२ मार्च या ५० दिवसांत तब्बल २१८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात पहिल्या कोरोना संक्रमिताचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. १ जानेवारीपर्यंत ४०७, १ फेब्रुवारीला ४१७ व आता २२ मार्चला संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ही ६३५ झाली. दररोज सरासरी चार ते पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. कोरोनाला क्षुल्लक समजणे महागात पडत आहे. अंगावर दुखणे काढणे, कोरोना चाचाणी उशिराने करणे जिवावर बेतणारे ठरत आहे.जिल्ह्यात १ जानेवारीनंतरच्या कोरोना विस्फोटात तब्बल २६,०९२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर दोन टक्क्यांवर आलेला मृत्यूचा दर हा १.३२ टक्क्यांपर्यंत माघारला आहे. मात्र, आता रुग्णसंख्या घटत असताना या दराने उचल खाल्ली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, अनेकदा रुग्ण कोरोनाऐवजी अनावश्यक चाचण्या करतात. त्याला ‘एचआरसीटी’सारखी महागडी तपासणी करण्यास सांगितले जाते. कोरोना चाचणी उशिरा केल्यानेही धोका वाढत असल्याचे सांगण्यात आले. संक्रमित मृतांमध्ये ६० ते ७० वर्षे वयोगटातील ज्येष्ठांचा समावेश अधिक आहे. 

त्रिसूत्रीऐवजी आता पंचसूत्रीकोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत चेहऱ्याला मास्क, वारंवार हात धुणे व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत होते. आता त्यामध्ये कोरोना चाचणी व लसीकरण यांचा समावेश करून पंचसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.

लसीकरणाचा वेग वाढणार केव्हा?६० वर्षावरील ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील कॉमार्बिड आजाराच्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यत दगावलेल्या संक्रमितांमध्ये ८० टक्क्यांवर प्रमाण याच वयोगटातील आहे. जिल्ह्यात ४५ वर्षावरील ८,०४६ व ६० वर्षावरील ५०,५१७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. लसीकरणाची गती वाढण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या