शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविताना गावांमध्ये सूक्ष्म नियोजनासह अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. उपचार सुविधा वाढविण्याबरोबरच प्रभावी ...

अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविताना गावांमध्ये सूक्ष्म नियोजनासह अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. उपचार सुविधा वाढविण्याबरोबरच प्रभावी देखरेख, सातत्यपूर्ण समन्वय व जनजागृती याद्वारे ग्रामस्तरीय समित्यांनी कोरोना साथ नियंत्रणासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दिले.

कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने तालुकानिहाय आढावा घेण्यासाठी आयोजित ऑनलाईन बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंधक समिती सदस्य हे उपस्थित होते. अमरावती, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी, मोर्शी या चार तालुक्यांतील समित्यांच्या आढावा त्यांनी यावेळी घेतला.

कोरोना साथ नियंत्रणासाठी ग्रामस्तरीय समित्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. यासोबतच ‘ब्रेक द चेन’च्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हायला हवे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस विभागाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. विशेषतः गृह विलगीकरणातील व्यक्तींकडून नियमभंग होऊ नये, यासाठी कसोशीने देखरेख करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बॉक्स

बालरोगतज्ज्ञांचा ‘टास्क फोर्स‘ स्थापन

कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळीच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. बालज्गतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. याद्वारे लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे.

बॉक्स

‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांकरिता स्वतंत्र वॉर्ड

‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांकरिता स्वतंत्र वॉर्ड निर्माण केले जात आहेत. आवश्यक औषधसाठा व उपचार सामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता, रेमडेसिविर इंजेक्शन तसेच म्युकरमायकोसिस आजारावरील औषधसाठा, लहान बालकांसाठी आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने परिपूर्ण तयारी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.