अमरावती : कोरोनामुळे शाळांमध्ये ना परिपाठ ना शैक्षणिक सहल ना क्रिडा महोत्सव असे सध्याचे चित्र आहे. दरवर्षी डिसेंबर महिना म्हटला की शाळा महाविद्यालयांमधून शैक्षणिक सहली वार्षिक स्नेहसंमेलन याशिवाय क्रीडा महोत्स्वाची धामधूम असते. मात्र, यंदा कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम लॉकडाऊनच आहेत.
दरम्यान सहलीसाठी एसटी आगारात बस आरक्षित करणे याकरिता शिक्षकांची लगबग पूर्णपणे थांबली आहे. यंदा कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीने निर्बंध आले आहेत. सध्या शाळांमधून परिपाठाचा आवाजही मुक्त झाला आहे. दररोज फक्त ४० मिनिटाचे सलग चार तास त्यामुळे शाळेतील मुलांचा किलबिलाट बंद असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात शाळा, महाविद्यालयात शैक्षणिक सहल वार्षिक स्नेहसंमेलनाची धामधूम सुरू असते. शाळांचे शैक्षणिक सहलीचे नियोजन करीत विविध ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाणी सहलीतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. सहली मुळे मुलांचा उत्साह वाढत असतो. अनोळखी गावांचा प्रवास करताना विद्यार्थी निराळा विश्वात रममाण होतात.. शैक्षणिक सहल झाली की शाळांमधून वार्षिक स्नेहसंमेलन नियोजन सुरू होते. वार्षिक स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सादर करण्याची एक चांगली संधी मिळते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम बसवून त्याच्या आत लपलेल्या खऱ्या कलाकाराचे रूप व्यक्त होते. परंतु यंदा मार्च महिन्यापासून शैक्षणिक नियोजन विस्कळित झाले आहे. सध्या ऑनलाईन तर काही ठिकाणी ऑफलाइन शिक्षण सुरू आहे. नुकतेच नववी ते बारावीपर्यंत वर्ग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. शाळांची जरी सुरुवात झाली असली तरी विद्यार्थ्यांसाठी दक्षता व खबरदारी साठी निबंध ठेवण्यात आले आहेत. यामुळे दरवर्षी नियोजन करण्यात येत असलेल्या शैक्षणिक सहली होणार नाहीत. तसे कलागुणांचा आनंद देणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे यंदा नियोजन करता येणार नाही. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याने स्नेहसंमेलनात सारखे कार्यक्रम घेता येत नाहीत.
कोट
दरवर्षी डिसेंबर जानेवारी महिन्यात आम्ही शैक्षणिक सहल व स्नेहसंमेलन आयोजित करीत असतो. मात्र यांना कोरोना परिस्थितीने वातावरण बदलले आहे .सध्याचा शाळाचे क्रिडा महोत्सव व परिपाठ,स्नेहसंमेलन घेता आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यक खबरदारी घेण्यास प्राधान्य द्यावे लागते.
- राजेश सावरकर, मुख्याध्यापक