शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ कॅम्पमधून कोरोना हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:10 IST

लसीकरण पूर्ण, पहिल्या-दुसऱ्या लाटेत एकही बळी नाही, नियोजनाचे यश अमरावती : सुमारे ३० एकरात विस्तारलेल्या राज्य राखी पोलीस दल ...

लसीकरण पूर्ण, पहिल्या-दुसऱ्या लाटेत एकही बळी नाही, नियोजनाचे यश

अमरावती : सुमारे ३० एकरात विस्तारलेल्या राज्य राखी पोलीस दल (एसआरपीएफ) कॅम्प परिसरात कोरोनाला हातपाय पसरायला जागाच मिळाली नाही. विशेष म्हणजे, सुरुवातीला उदासीनता व आता लसीची मारामार अशी स्थिती सर्वत्र, दिसत असताना एसआरपीएफ कॅम्पमध्ये दुसऱ्या डोसचे ९० टक्क्यांवर लसीकरण झाले आहे. समादेशक हर्ष पोदार यांच्या नेतृत्वात कुठलीही जीवितहानी न होता कोरोना संसर्गाला या परिसरातून परतविण्यात आले.

राज्य राखीव पोलीस दलाची वसाहत असलेल्या कॅम्पमध्ये ११०० जवानांचे कुटुंब मिळून चार हजारांवर आबालवृद्धांचे वास्तव्य आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी येथील जवानांना राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आले होते. कॅम्पमध्ये परतल्यानंतर त्यांची वेळोवेळी कोरोना चाचणी व योग्य औषधोपचाराची सुविधा त्यांना उपलब्ध करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट नागरिकांवर कोसळत असताना एसआरपीएफ कॅम्पमध्ये फेब्रुवारीमध्येच पहिल्या डोसचे १०० टक्के व दुसऱ्या डोसचे ९० टक्क्यांवर लसीकरण मार्चमध्येच करण्यात आले. लसीकरण व वे‌ळोवेळी होणाऱ्या तपासणीच्या बळावर गंभीर कोरोनाग्रस्त वा कुणाचा मृत्यू एसआरपीएफ कॅम्प परिसरात झाला नाही. विशेष म्हणजे, ऑक्सिजन तुटवड्याची पूर्वकल्पना मिळाल्याने एसआरपीएफ कॅम्पमध्ये मार्चमध्येच दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दाखल करण्यात आले होते.

-----------------

वडाळीतील पाहुण्या पक्ष्यांची संख्या वाढली

एसआरपीएफ कॅम्पच्या पुढ्यात असलेल्या वडाळी तलाव यंदा बंद करून त्याचे खोलीकरण एसआरपीएफच्या नेतृत्वात करण्यात आले. त्याच्या परिणामी हिवाळ्यात पहिल्यांदाच विदेशातून विणीच्या हंगामात येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांची संख्या वाढल्याचे निरीक्षण पक्षिप्रेमींनी नोंदविले.

--------------------

कोरोना संक्रमणाची भयावहता ओळखून वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्या. लसीकरणात मोठा टप्पा गाठला आहे. याद्वारे कोरोनाला रोखण्यात आम्ही यशस्वी ठरलो.

- हर्ष पोदार, समादेशक एसआरपीएफ, अमरावती