शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

शेती साहित्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण कुणाचे?

By admin | Updated: July 12, 2014 00:39 IST

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके रास्त भावात उपलब्ध व्हावी, तसेच यामध्ये गैरव्यवहार होऊ नये यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

सुनील देशपांडे अचलपूरशेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके रास्त भावात उपलब्ध व्हावी, तसेच यामध्ये गैरव्यवहार होऊ नये यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके नेमण्यात आली आहेत. साहित्याची तपासणी करून शेतकऱ्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर शासनाने भरारी पथके निर्माण केलेली असली तरी ती कुचकामी ठरत असून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात गारपीट व अतिवृष्टी झाली. नुकसानीने शेतकरी खचला आहे. तरीही तो खरीप पेरणीकरिता सज्ज झाला आहे. बी-बियाणे बहुतांश शेतकऱ्यांनी मिळेल त्या मार्गाने प्राप्त केले. यात शेतकऱ्यांची बी-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके घेताना फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागातर्फे भरारी पथकांची नेमणूक करण्यात येते, मात्र ही पथके खरोखरच तपासणी करून संबंधितांवर कारवाई करतात का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हास्तरीय पथकामध्ये जिल्हास्तरीय अधिकारी व तालुक्याच्या पथकात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असतो. ही पथके बियाणे आणि खतांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवतात, असे सांगितले जाते. परंतु भरारी पथक हे अचानक कृषी दुकानांना भेटी देतात तो केवळ देखावा असतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.भरारी पथक भेट देणार किंवा धाड टाकणार याची माहिती अगोदरच काही बड्या कृषी संचालकांना मिळालेली असते, असे शेतकरी वर्गाचे म्हणणे असून हे भरारी पथके काय कामाची? या पथकातील अधिकारी फक्त खिसे गरम करण्यासाठी आहेत काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.भरारी पथकाच्या दौऱ्याबाबत गुप्तता व गोपनीयता पाळून प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यास बरेच काही सत्य बाहेर येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा जिल्हयावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीत शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यात बनावट बियाण्यांच्या आक्रमणामुळे तर शेतकऱ्यांना अधिकच त्रासाचा सामना करावा लागणार आहे. ही स्थिती उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यात भरारी पथकांची केलेली नेमणूकही निरूपयोगी सिध्द होत असल्याचे दिसते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी आहे.