शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परस्परविरोधी तक्रारींचा फंडा

By admin | Updated: August 18, 2015 00:24 IST

आता याप्रकरणातील आठ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलीस चौकशी निष्पक्षपणे आणि मूळ मुद्यांच्या आधारे झाल्यास खरे काय...

अमरावती /अचलपूर : आता याप्रकरणातील आठ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलीस चौकशी निष्पक्षपणे आणि मूळ मुद्यांच्या आधारे झाल्यास खरे काय ते बाहेर येईलच. अवैध व्यवसाय आणि गुंडगिरीसाठी बारूद गँगच्या सदस्यांना नेमकी कोणत्या अधिकाऱ्यांची मदत मिळाली? या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. ‘बारूद गँग’ला विरोध करणाऱ्या एखाद्या व्यक्तिचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याला बेदम मारहाण करायची. ती व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेली की लगेच या गँगच्या एखाद्या सदस्याने स्वत:लाच जखमी करून घ्यायचे आणि त्या व्यक्तिविरूध्द पोलिसांत तक्रार नोंदवायची, असा यांचा फंडा होता. पोलिसही डोळे झाकून परस्पर विरोधी तक्रारी नोंदवून घ्यायचे. दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करायचे. पण, प्रकरणाची शहानिशा करण्याची तसदी कधीही पोलिसांनी घेतली नाही. पोलिसांच्या या भूमिकेमुळेच की काय मारहाण झाल्यानंतरही बरेचदा अन्यायग्रस्त व्यक्ती पोलिसांत तक्रार नोंदविण्यास धजावत नसत. असाच प्रकार अमित बटाऊवाले हत्याकांडानंतरही घडल्याची चर्चा आहे. अमितचा खून झाल्यानंतर बारूद गँगचे शाहबाद आणि बादशाह हे दोन सदस्य पोलीस ठाण्यात गेले. त्यातील शाहबाद हा जखमी होता. बारूद गँगवर पोलिसांचाच वरदहस्त असल्याने त्यांच्या कूकृत्यामध्ये पोलीस मुकाटपणे परस्परविरोधी गुन्हे दाखल करीत असत. असाच प्रकार सात ते आठ महिन्यांपूर्वी मुंदे हल्ला प्रकरणातही घडला होता. बारूद गँगचा एक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष तर मुख्य आरोपी नगरसेवक असल्याने त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे जनता आता बोलून दाखवीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह वरिष्ठांनी अद्यापही या गुन्हेगार असलेल्या शहराध्यक्षावर पक्षांतर्गत कारवाई केली नाही, ही बाब या जनचर्चेला दुजोरा देणारी आहे.रेतीचे ट्रक पकडल्यास मुंबईतून यायचे फोनजुळ्या नगरीत सुरू असलेल्या वाळू माफियांच्या उच्छादाला आणि त्यानंतर घडलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडाला अनेक पैलू आहेत. याप्रकरणी असलेली पोलिसांची संशयास्पद भूमिका उघड झाल्यानंतर आणि त्यानंतर नाईलाजास्तव पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्याने आतापर्यंत ‘बारूद गँग’च्या दहशतीखाली असलेल्या जनतेचा धीर चेपला आहे. रेती तस्करीत एका मोठ्या पक्षवजा संघटनेच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांचा सहभाग असून रेती तस्करीचे ट्रॅक्टर पकडल्यानंतर ते सोडण्यासाठी थेट मुंबईहून फोन येत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कराअचलपूर : येथील अमित बटाऊवाले व मोहन बटाऊवाले यांच्यावर वाळूमाफियांनी केलेल्या हल्ल्यातील आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई व महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अचलपूर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने राजा पिंजरकर, गोविंद शिरभाते आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली याबाबत कारवाई करण्यासाठी महसूलमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरूयाप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडूनही केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आणखी एका युवकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. अमित बटाऊवाले हत्याकांडात नगरसेवक मो. शाकीर हे आरोपी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे. याबाबत पालिकेतही ठराव घेतला जावा. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत.- नरेंद्र फिसके, माजी उपनगराध्यक्ष,माजी शिवसेना तालुका प्रमुख.