शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

अधिकाऱ्यांच्या दालनात कंत्राटदारांना ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:28 IST

महापालिका आयुक्तांचा सचिव योगेश कोल्हेला एसीबीने पकडल्याने अधिकाऱ्यांच्या दालनात कंत्राटदारांना ‘नो एन्ट्री’ करण्यात आली आहे. कुठल्याही देयकाची फाइल घेऊन कंत्राटदारांना दालनात सोडू नये, अशी सूचना अधिनस्थ यंत्रणेला देण्यात आली आहे.

ठळक मुद्देलाचखोरी प्रकरणाने धास्ती : महापालिकेत टक्केवारीला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका आयुक्तांचा सचिव योगेश कोल्हेला एसीबीने पकडल्याने अधिकाऱ्यांच्या दालनात कंत्राटदारांना ‘नो एन्ट्री’ करण्यात आली आहे. कुठल्याही देयकाची फाइल घेऊन कंत्राटदारांना दालनात सोडू नये, अशी सूचना अधिनस्थ यंत्रणेला देण्यात आली आहे. उर्वरित पीएंना समज देण्यात आल्याने कोल्हे प्रकरणाची महापालिकेने किती धास्ती घेतली, हे लक्षात येण्याजोगे आहे.महापालिका आयुक्तांसह दोन्ही उपायुक्त, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखापरीक्षकांसह साऱ्याच विभागात अनेक कंत्राटदार स्वत: फायली फिरवतात. स्वघोषित बड्या कंत्राटदारांना विभागप्रमुख वा लिपिकाच्या हाती फाइल देणे ‘क्रेडिटेबल’ वाटत नसल्याने ते थेट आयुक्तांकडे फाइल घेऊन पोहोचतात. नस्ती वा फाइल आवक-जावक मधून एन्ट्री घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोचली पाहिजे, असा दंडक आहे. मात्र स्वत: फाइल घेऊन न गेल्यास संबंधित लिपिक वा एखादा विभागप्रमुख देयक मंजूर करून घेणार नाहीत किंवा त्यास उशीर होईल, अशी भीती वाटत असल्याने अनेक जण त्यांच्या देयकाची फाइल स्वत: हाताळतात. आयुक्त किंवा अन्य अधिकारी, विभागप्रमुख त्याला टोकत नाहीत. कंत्राटदाराने आणलेल्या फाइलवर स्वाक्षरी केली जात असल्याने फाइल लिपिकांकरवी व आवक-जावकमध्ये नोंद घेऊन या विभागातून त्या विभागात पाठविण्याचा नियम पायदळी तुडविला जातो. त्याच साखळीमुळे योगेश कोल्हेने बांधकाम कंत्राटदाराकडून वरिष्ठांंची स्वाक्षरी करून घेण्यासाठी एक टक्का लाच मागितली व तो एसीबीकडून रंगेहाथ पकडल्या गेला. त्यातून महापालिकेची टक्केवारीची बजबजपुरी उघड झाली. त्या पार्श्वभूमीवर आपण पकडले गेलो तर, वा एखादा कंत्राटदार आपल्याला फसविणार तर नाही ना, अशी भीती अनेकांना सतावू लागली आहे. त्यामुळे कंत्राटदार वा अन्य एजंसीधारकांना तूर्तास थेट प्रवेशाला अघोषित मनाई आहे. कंत्राटदाराकडील फाइल स्वीकारली जाणार नाही, ही मागचीच सूचना नव्याने दिली जात आहे. कोल्हेची लाचखोरी उघड झाल्याने का होईना, टक्केवारीला थोडासा ब्रेक बसला आहे.लाच चेकने!नोटबंदीच्या काळात महापालिकेत धनादेशाद्वारे लाच स्वीकारली गेली. लाचेची रक्कम स्वत:च्या खात्यात जमा न करता आप्ताच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे त्यावेळी बोलले गेले. कोल्हे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘नगदी’ ला नकार देऊन धनादेश आपण अन्य पर्यायांची चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे.