शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

काऊंटडाऊन सुरू

By admin | Updated: October 9, 2014 22:54 IST

विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून प्रचारतोफा सोमवार १३ आॅक्टोबर रोजी थंडावणार आहे. सध्या सर्वच मतदारसंघांतील प्रचार शिगेला पोहोचल्याने लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.

सोमवारी थंडावणार प्रचार तोफा : उमेदवारांची दमछाकगजानन मोहोड - अमरावतीविधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून प्रचारतोफा सोमवार १३ आॅक्टोबर रोजी थंडावणार आहे. सध्या सर्वच मतदारसंघांतील प्रचार शिगेला पोहोचल्याने लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महायुती व आघाडी नामांकन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापूर्वी तासाभरात तुटली. स्वबळावर लढण्यासाठी ‘इलेक्टीव्ह मेरिट’ असलेल्या उमेदवारांची शोधाशोध झाली. अन्य इच्छुकांचे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी तीन दिवस मनधरणी करण्यात गेले. त्यानंतरही शिल्लक राहिलेली नाराजी दसऱ्याला सोने देऊन दूर करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर १ आॅक्टोबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. सर्वच राजकीय पक्षांद्वारे प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. प्रचाराला अल्प कालावधी मिळाल्यामुळे प्रत्येक उमेदवार प्राणपणाने प्रचाराला लागला. त्यामुळे जिल्ह्यात सध्या प्रचाराची धूळवड जाणवत आहे. सोमवार १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्यानंतर ही धूळवड शांत होईल.१ आॅक्टोबरला दुपारी ३ वाजतानंतर प्रत्येक मतदारसंघातील विधानसभा निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, प्रचाराचा मुहूर्त करून सर्व राजकीय व अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली. युती-आघाडी तुटल्यानंतर अनेक उमेदवारांनी नव्या पक्षांमध्ये घरठाव केला. परिणामी इच्छुक उमेदवार व पदाधिकारी नाराज झालेत. त्यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ ही भूमिका घेतली. त्यांची मनधरणी करून त्यांना प्रचाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा २ ते ३ दिवस खर्ची पडले. मतदान १५ आॅक्टोबरला होणार आहे. त्यामुळे दोन दिवसपूर्व १३ आॅक्टोबरला प्रचार बंद होईल. गुरूवारनंतर प्रचाराला केवळ ४ दिवस उरले आहेत. एवढ्या कमी अवधीत ‘हाऊस टू हाऊस’ प्रचार करणे उमेदवारांना शक्य नसल्याने अख्खे कुटुंब प्रचारात उतरल्याचे प्रथमच पहायला मिळाले आहे.