शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

लोकप्रतिनिधींचा अवमान; अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी डीएफओ बाला व एसीएफ पवार यांच्या अफलातून कारभाराची यादी वजा तक्रार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केली आहे. बाला  व पवार हे दोन्ही वरिष्ठ वनाधिकारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, बळवंत वानखडे यांचा शिष्टाचार मानत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनविभागाचे उपवनसंरक्षक एन.सी. बाला, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांनी वारंवार लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याप्रकरणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, असे पत्र राज्याच्या महसूल व वनविभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे. त्यामुळे ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण आणि बासलापूर वन तलावावर झालेल्या जलपूजनाचा मुद्दा तापला आहे.सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी डीएफओ बाला व एसीएफ पवार यांच्या अफलातून कारभाराची यादी वजा तक्रार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केली आहे. बाला  व पवार हे दोन्ही वरिष्ठ वनाधिकारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, बळवंत वानखडे यांचा शिष्टाचार मानत नाही. येथील ऑक्सिजन पार्कमध्ये विकासकामे आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील बासलापूर वनतलावावर झालेल्या  जलपूजनानंतर फलक काढण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर रोजी ना. नितीन गडकरी हे ऑक्सिजन पार्कमध्ये येणार असताना डीएफओ बाला, एसीएफ पवार यांनी येथे भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही, असे पत्रात नमूद आहे. सेवानिवृत्त एसीएफ अशोक कविटकर यांनी ऑक्सिजन पार्कमध्ये स्वखर्चातून लावलेले फलक काढले असून, जागेची साफसफाई करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेण्याची धमकी दिली. आरएफओ नवरे यांच्या माध्यमातून फलक काढून ते कचऱ्यात टाकण्यात आले, ही बाब गंभीर असल्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी ३ नोव्हेंबर रोजी वनविभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखाेल चौकशी करून दोषी असलेले डीएफओ बाला व एसीएफ पवार यांच्यावर नियमानुसार कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी वन खात्याला दिले आहे.  डीएफओ बाला, एसीएफ ज्योती पवार यांनी हेतुपुरस्सर लोकप्रतिनिधींचा अवमान योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.  

वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी उदासीनता गंभीर वन्यजीव, वनसंरक्षणाच्या दृष्टीने वनबंधाऱ्याची कामे होणे अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजन पार्क, निसर्ग पर्यटन केंद्र, बायो डायव्हर्सिटी पार्कच्या बांधकामामुळे जनसामान्यांना वनविभागाप्रति आपुलकीची भावना निर्माण होते. मात्र, जबाबदार उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षकांची उदासीनता आणि लोकप्रतिनिधींचा अवमान ही बाब योग्य नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी प्रधान सचिवांना पत्र दिल्याची माहिती लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार