शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

समाजकारणातून काँग्रेसला मजबुती देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:21 IST

राहुल गांधींनी टाकलेला विश्वास हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. तुम्हा लोकांच्या प्रेमामुळे राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्याची संधी मिळाली आहे. राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन काँग्रेस पक्षाला मजबूत करू. २०१९ मध्ये पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेत येईल, असा विश्वास आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : तिवस्यात जंगी स्वागत; सोटागीर महाराज, राष्ट्रसंतांना नमन

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : राहुल गांधींनी टाकलेला विश्वास हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. तुम्हा लोकांच्या प्रेमामुळे राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्याची संधी मिळाली आहे. राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन काँग्रेस पक्षाला मजबूत करू. २०१९ मध्ये पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेत येईल, असा विश्वास आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विदर्भातील एकमेव महिला आमदार काँग्रेसच्या यशोमती ठाकूर याची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी नियुक्ती केली. यानंतर सोमवारी प्रथमच तिवसा येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे ढोल-ताशे व फटाक्याच्या आतषबाजीत पक्षाच्यावतीने स्वागत-सत्कार करण्यात आला. तिवसा तालुका, शहर व महिला काँग्रेसच्यावतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.सर्वप्रथम सुरवाडी, पेट्रोल पंप चौक येथे यशोमती ठाकुरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर आ. ठाकूर यांनी तिवसा नगरीचे आराध्यदैवत सोटागीर महाराज व गुरुकुंज मोझरी येथे तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन यशोमती ठाकुर यांनी घेतले यावेळी जि.प. शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख, माजी सभापती दिलीपराव काळबांडे, नगराध्यक्ष राजकन्या खाकसे, तिवसा तालुका काँग्रेस अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, संजय देशमुख, महिला काँग्रेस अध्यक्ष छाया दंडाळे, उपाध्यक्ष वैभव वानखडे, जि.प.सदस्य अभिजित बोके, पूजा आमले, अलका काळे, लोकेश केने, सचिन गोरे, अतुल देशमुख, जावरा कामनापूर येथील विश्वासराव बारबुदे, देवानंद चिचखेडे, भारत खैरकार, विनय चिचखेडे, हरिदास ढोके, बळीराम यावले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.