शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धारणीत काँग्रेस समर्थित उमेदवारांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:21 IST

तालुक्यातील आठ जागांसाठी थेट सरपंचाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात काँग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे यांनी सात जागांवर विजय मिळविल्याचा, ...

ठळक मुद्देग्रामपंचायत निकाल जाहीर; काँग्रेसचा ७, भाजपचा ३ जागांवर दावा

श्यामकांत पाण्डेय।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यातील आठ जागांसाठी थेट सरपंचाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात काँग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे यांनी सात जागांवर विजय मिळविल्याचा, तर भाजपचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी तीन ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा केला. मोगर्दा ग्रामपंचायतीवर ग्रामविकास एकता पॅनलने बाजी मारल्याचे जाहीर केले. निकालानंतर तीन ग्रामपंचातीवर दाव्यासंर्भात चढाओढ निर्माण झाली आहे.स्थानिक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मतमोजणीनंतर राजकिय पक्षांची दावे प्रतिदावे सादर केले. माजी आमदार केवलराम काळे आणि जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंह गैलवार यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजा पाटील यांच्या नेतृत्वात चक्क विजयी जुलूस काढीत आठपैकी सात ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच निवडून आणल्याचा दावा केला. केवळ नागझीरा वगळता इतर सर्व सात ग्रामपंचायतींवर काँग्रेसने सत्ता स्थापित केल्याचा त्यांनी दावा केला आहे.दुसरीकडे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी भाजपचे नागझीरा, घुटी आणि हरदोली या तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच भाजपचे असल्याचा दावा केला आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच भाजपचे असल्याचा दावा केला आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच त्यांच्या निवासस्थानी उपस्थित असल्याचा त्यांनी दावा केला, तर मोगर्दा ग्रामपंचायतवर ग्रामविकास एकता पॅनलचा विजयाचा दावा करण्यात आला आहे.शनिवारी झालेल्या सरपंचाच्या मतमोजणीत मोगर्दा येथे कुसुम धांडे, नागझीरा येथे रामकिशन धांडे, टिटंबा येथे सूरज मावस्कर, घुटी येथे मुंदाबाई धुर्वे, बैरागड येथे सविता सावलकर, राणामालूर येथे गंगाबाई जावरकर, हरदोली येथे तारासिंग कासदेकर, तर तातरा येथे ललिता जांबेकर विजयी झाल्या असल्याचे जाहीर करण्यात आले.