शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल सेवाकर वाढीमुळे काँग्रेस संतप्त

By admin | Updated: June 8, 2016 00:05 IST

मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्रीनंतर पेट्रोल व डिझेलच्या किमतीत अनुक्रमे ४ रूपये आणि २.४० पैशांची दरवाढ शासनाने केली.

जिल्हाभर आंदोलन : शासनाच्या विरोधात निदर्शनेअमरावती : मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्रीनंतर पेट्रोल व डिझेलच्या किमतीत अनुक्रमे ४ रूपये आणि २.४० पैशांची दरवाढ शासनाने केली. इतकेच नव्हे तर सेवाकरात ०.५ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय विनाअनुदानित सिलिंडरचे दरसुद्धा वाढविल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात भाजप शासनाचा जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या मार्गदर्शनात यानिमित्ताने आंदोलन करण्यात आले.एकीकडे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना शासनाने कोणत्या हेतुने दरवाढ केली?, असा सवाल जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. केंद्रात भाजपचे शासन आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घटले आहेत. असे असूनही शासनाने मात्र पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली. त्यामुळे ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवून जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजप शासनाचा निषेध करण्यात आला. याविरोधात जिल्हा, तालुका पातळीवर काँग्रेस पक्षाचेवतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व पदाधिकाऱ्यांनी तर तालुकास्तरावर तहसीलदारांना तालुकाध्यक्षांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. अचलपूर, तिवसा, दर्यापूरसह सर्व तालुक्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपसरकारविरोधात नारेबाजी केली. दर्यापूर येथे सुधाकर भारसाकळे, बबन देशमुख, श्रीकांत होले, शिवाजी देशमुख, सुनील गावंडे, प्रदीप देशमुख, गजानन देवतळे, गजानन जाधव यांनी आंदोलनात सहभाग घेतला. (प्रतिनिधी)