मोर्शी शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र पाळा येथील ग्रामपंचायत निवडणूक अविरोध घोषित करण्यात आली. यामध्ये सदस्य म्हणून प्रीती नरेंद्र जिचकार, संध्या विलास राऊत, वर्षा प्रकाश घोरमाडे, कांता दिवाकर यूवनाते, सरीता सुरेश कुकडे, करिष्मा नरेंद्र सोनागोते, इंदिरा अशोक गोडगाम, शोभा महादेव सातपाने, अजय पंजाबराव राऊत, राजेश बळीराम घोडकी, चंपत केळबाजी नेवारे यांची अविरोध निवड करण्यात आली. तालुक्यातील लिहीदा ग्रामपंचायतसुद्धा अविरोध झाली. आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी तालुक्यातील या दोन्ही ग्रामपंचायतींना २५ लक्ष रुपये विकास निधी देण्याची घोषणा केली आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत बक्षीस म्हणून हा निधी देण्यात येणार आहे.
मोर्शी तालुक्यातील दोन ग्रामपंचायती अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:39 IST