शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

स्थिती दुष्काळजन्य

By admin | Updated: September 19, 2015 00:02 IST

जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केली.

नजरअंदाज पैसेवारी ५९ पैसे : ६७ पैशांच्या आत पैसेवारीचे सुधारित निकषलोकमत विशेषगजानन मोहोडअमरावतीजिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केली. सर्व तालुक्यांची सुधारीत पैसेवारी ही ५९ पैसे आहे. तथापी शासनाने १६ सप्टेंबरला उशीरा घेतलेल्या निर्णयानुसार पैसेवारीचे यापूर्वीचे निकष बदललेले सुधारित पद्धतीनुसार ६७ पैशापेक्षा कमी व ६७ पैश्यापेक्षा जास्त असे दुष्काळजन्य स्थितीचे निकष ठरले आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६७ पैशांच्या आत असल्याने सोयी-सवलती मिळणार आहेत. अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागाची नजरअंदाज पैसेवारी ही दरवर्षी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येत असते. परंतु यंदा या तीनही विभागांसह राज्यात असणारी दुष्काळसदृश जाहीर करण्याच्या अनुषंगाने चालू हंगामात ३० सप्टेंबर ऐवजी १५ सप्टेंबर तारीख समजून तीनही विभागाची नजरअंदाज पैसेवारी तत्काळ जाहीर करावी, असे महसूल विभागाचे उपसचिव मंदार पोहोरे यांनी १५ सप्टेंबरला विभागीय आयुक्तांना निर्देश दिले होते. या आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी १६ सप्टेंबरला शासनाने पैसेवारी काढण्याची सुधारित पद्धत जाहीर केली. या आदेशान्वये मागील पाच वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशाच्या कमी व जास्त असे पैसेवारी आलेली गावे घोषित करावी, असे आदेश शासनाने दिलेत. सर्व विभागाची पैसेवारी एकाच वेळीराज्यातील कोकण, पुणे व नाशीक विभागाची नजरअंदाज पैसेवारी १५ सप्टेंबरला जाहीर करण्यात येते व औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाची ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येत असते. किंबहुना राज्यातील दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर करण्याच्या अनुषंगाने शासनाने सर्व विभागांची नजरअंदाज पैसेवारी १५ सप्टेंबरला एकाच वेळी जाहीर करण्याच्या अनुषंगाने १५ सप्टेंबरला हा निर्णय घेतला. पैसेवारीच्या ५० पैशाचे निकष बदललेशासनाने ४ मार्च १९८९ चे ठरावानुसार लगतच्या मागील १० वर्षांच्या कालावधीत ३ उत्तम उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण समजून ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांना सोयीसवलती देण्यात येतात. मात्र शासनाने १६ सप्टेंबर रोजी पैसेवारीचे प्रचलित निकष बदलविले, या नव्या निकषानुसार मागील पाच वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशांपेक्षा कमी व ६७ पैश्यापेक्षा जास्त असे पैसेवारीचे निकष ठरविण्यात आलेले आहेत. केंद्राला करणार मदतीची मागणीजून महिन्यात पेरणीपासून पावसाची दडी व त्यानंतर पुन्हा पावसाची प्रदीर्घ दडी यामुळे राज्यात एकाही जिल्ह्याने पावसाची अपेक्षित सरासरी पार केलेली नाही. राज्यात दुष्काळसदृष्य स्थिती आहे व ही दुष्काळ स्थिती जाहीर करून केंद्र शासनाकडून मदतीची ज्ञापन पाठविण्यात येणार आहे.