शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र संरक्षणाबाबत ‘एनटीसीए’त चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:04 IST

देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदोन दिवसीय कार्यशाळा १२ आशियाई देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे. भारतातील जंगलाच्या तुलनेत १० ते १५ हजार वाघांचे सहजतेने संवर्धन होऊ शकते, असा अभ्यासपूर्ण आढावा सादर करण्यात आला आहे.एनटीसीएच्या पुढाकाराने दिल्ली येथे २८ व २९ जानेवारी रोजी व्याघ्र संवर्धन करणाऱ्या १२ आशियाई देशाच्या प्रतिनिधींची तिसरी स्कॉक टेकींग परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. थायलंड, कोलंबिया, व्हिएतनाम, रशिया, इंडोनेशिया, भूतान, कंबोडीया, मलेशिया, मॅनमार्क, लायोस, नेपाळ व भारत देशाचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. यात व्याघ्र अभ्यासक विलास कारंभ, राजेश गोपाल, वाय. झाला यांनी देशातील वाघ संवर्धनाविषयी ंिचंता वर्तविल केली. महाराष्ट्रातून पेंच व्याघ्र प्रकल्पातून रामाराव, रवि गोवेकर, सह्यांद्रीचे गुजर यांची उपस्थिती होती. चीन वगळता अन्य १२ आशियाई देशाचे प्रतिनिधींनी सन- २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याविषयी मते वजा आढावा सादर केला. जगातील एकूण वाघांपैकी ५७ टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. त्यामुळे भारताला 'व्याघ्रभूमी' असे संबोधले जाते. मात्र, अलीक डे वाघांचे संरक्षण, संवर्धनाचा विषय ऐरणीवर आला आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांचे संचार चिंताजनक असल्याची बाब या परिषदेत मांडली गेली. भारतात वाघांच्या संख्येनुसार वन्यजीवांचे व्यवस्थापन योग्यप्रकारे होत नाही. देशात सन २०१४ मध्ये २,२६६ वाघांची संख्या होती. आता ती अडीच ते तीन हजांरांवर पोहचली आहे. व्याघ्रांचे संवर्धन, संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी वन्यजीव व्यवस्थापन महत्वाचे असल्याबाबतचे मत परिषदेतून मांडल्या गेले. चीनमध्ये वाघ अवयांची तस्करी होत असल्याची बाब अन्य आशियाई देशांच्या प्रतिनिधींनी मांडली आहे.व्याघ्रांच्या संवर्धनाविषयी परिषदेत या मुद्द्यावर मंथन- व्याघ्रांचे संचार मार्ग धोकादायक- मानव -वन्यजीव संघर्ष टाळण्याबाबत उपाययोजना- व्याघ्र अवयवांची तस्करी रोखणे- शिकाऱ्यांवर अंकुश मिळविणे- वन्यजीव व्यवस्थापन कृती आराखडा तयार करणे- व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांचे संरक्षणव्याघ्रभूमी अशी भारताची ओळख आहे. मात्र, वाघांचे मृत्यू, शिकारी, अवयवांची तस्करी या घटनांमध्ये वाढ होत आहे. भारत वगळता अन्य आशियाई देशांनी सन २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा मानस केला आहे. देशात वन्यजीव व्यवस्थापनात उणिवा आहेत.- यादव तरटे पाटील,वन्यजीव अभ्यासक, अमरावती

टॅग्स :Tigerवाघ