शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कंपोस्ट डेपो? छे ! कचºयाचा डोंगरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:31 IST

आठ लाख लोकसंख्येच्या अंबानगरीतील हजारो टन कचरा वर्षानुवर्षे नजीकच्या सुुकळी येथील कंपोस्ट डेपोत ‘डम्प’ करण्यात येत असल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

ठळक मुद्देसुकळी प्रकल्पाचे वास्तव : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची आत्यंतिक निकड

अमरावती : आठ लाख लोकसंख्येच्या अंबानगरीतील हजारो टन कचरा वर्षानुवर्षे नजीकच्या सुुकळी येथील कंपोस्ट डेपोत ‘डम्प’ करण्यात येत असल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सुकळी गावाचे आरोग्य या कंपोस्ट डेपोमुळे धोक्यात आले आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी अत्यंत निकडीची आहे.या कंपोस्ट डेपोत सुमारे ७ ते ८ लाख टन कचरा विनाप्रक्रिया पडला असून त्यात शहरातून निघणाºया दैनंदिन २०० टन कचºयाची भर पडत आहे. येथे कचरा साठविण्याची मर्यादा १०-१२ वर्षांपूर्वीच संपुष्टात आली असून आता त्याठिकाणी कचरा साठविण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने कचरा समस्येचा स्फोट होण्याची भीती आहे.महापालिका अस्तिवात येण्यापूर्वीच कचरा शहराबाहेर साठविण्यासाठी सुकळी येथील जागेचे आरक्षण कंपोस्ट डेपोसाठी करण्यात आले. तूर्तास या ठिकाणची ९.३८ हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. नगरपालिकेच्या काळापासून सुकळी येथे महापालिका हद्दीतून दैनंदिन निघणारा घनकचरा साठविला जातो. त्या घनकचºयावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने तेथे डोंगरसदृष्य परिस्थिती आहे. शहरात अन्य ठिकाणी कंपोस्ट डेपोचे आरक्षण असताना तेथे कचरा साठवणूक होत नसल्याने सुकळीत ७ ते ८ लाख टन कचरा साठविण्यात आल्याने हा प्रकल्प केव्हाचाच ओव्हरफ्लो झाला आहे. कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने या भागातील ‘डीपी रोडलाही कचºयाने कवेत घेतले आहे. दुसरीकडे कचºयाचा डोंगर साचल्याने सुकळीसह लसनापूर ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात या भागाची परिस्थिती हाताबाहेर जाते. नेहमीप्रमाणे याही पावसाळ्यात कचरा डेपोत कचरा डम्प करण्यासाठी साधा पोकलॅण्ड देण्याची सवड प्रशासनाला मिळाली नाही. कचºयाचा ५० ते ६० फूट उंचीचा थर लागल्याने कचरा वाहतूकदारांचे ट्रक कचºयाच्या डोंगरावर चढविणे शक्य नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत येथील कचरा समस्येचा स्फोट झाल्यास आश्चर्य वाटू नये, अशी विद्यमान स्थिती आहे.तो प्रकल्प बंदचसुकळी येथील कंपोस्ट डेपो ओव्हरफ्लो झाला. कचºयातील प्लास्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प गाजावाजा करुन उभारण्यात आला. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे प्लास्टिक प्रोसेसिंग युनिटचे कार्यान्वयन होते. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे उदासीन धोरण व त्यात महावितरणने घातलेला खोडा या प्रकल्पाच्या मुळावर उठला. २ आॅक्टोबर २०१६ ला उद्घाटन झालेला हा प्रकल्प वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे कंपोस्ट डेपोतील कचरा समस्या अधिक ज्वलंत झाली आहे.