शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

एडीफायची चौकशी पूर्ण

By admin | Updated: June 18, 2016 23:59 IST

देवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित कठोरा स्थित एडीफाय शाळेसंदर्भातील चौकशी शनिवारी पूर्ण झाली.

अधिकृत की अनधिकृत? : देवी शिक्षण संस्थेचा मान्यतेचा दावाअमरावती : देवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित कठोरा स्थित एडीफाय शाळेसंदर्भातील चौकशी शनिवारी पूर्ण झाली. दरम्यान एडीफाय शाळेला शासनाची मान्यता मिळाल्याचा दावा शाळा व्यवस्थापनाने शनिवारी रात्री केला.पालक रविकिरण पाटील व अन्य काही जणांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी एडीफाय शाळेच्या चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी एडीफाय शाळा गाठून चौकशी केली. या चौकशीत प्रथमदर्शनी एडीफायला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची कुठलीही मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले होते. शनिवारीसुद्धा एडीफायच्या चौकशीचे गुऱ्हाळ सुरू होते. सायंकाळपर्यंत शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून ही शाळा नियमबाह्य असल्याचा दावा केला जात होता. शाळेला मान्यता नसल्याने पालकांकडून उकळलेली रक्कम, त्यांची झालेली फसवणूक याबाबत फौजदारी तक्रार नोंदविण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले होते. सायंकाळच्या सुमारास शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता चौकशी पूर्ण झाली. उशीरा रात्रीपर्यंत आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सोपवू, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही चौकशीचे गुऱ्हाळ सुरूच राहिले. सायंकाळी ७.३० च्या सुमारास देवी एज्युकेशन सोसायटीकडून एडीफाय स्कुलला स्वयंअर्थसहाय्यित शाळा म्हणून परवानगी मिळाल्याचे सांगण्यात आले. तथापि परवानगीचे अधिकृत दस्तऐवज आमच्याकडे पोहोचले नसल्याचे शिक्षण उपसंचालकांनी रात्री ९ च्या सुमारास स्पष्ट केले. शाळेच्या मान्यतेचा मुद्दा आता सोमवारीच निकाली निघेल. खासगी कंपनीची फ्रेंचाईसी असलेली शाळा चालविणे नियमबाह्य आहे. एडीफाय शाळेला शासनमान्यता मिळाली असेल तर नियमांचे काय, हा मुद्दा पुन्हा उपस्थित होणार आहे. (प्रतिनिधी)उशिरा रात्रीपर्यंत संदर्भीय अहवाल माझ्यापर्यंत पोहोचला नाही. प्राथमिक चौकशीत एडीफाय नियमबाह्य ठरते. अहवाल आल्यानंतरच यावर बोलता येईल.- एस.बी. कुलकर्णी, उपसंचालकस्वयंअर्थसहाय्यीत शाळा म्हणून एडीफायला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन २०१६-१७ साठी परवानगी दिली आहे. विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये ते नमूद आहे.- रवी इंगळे, संचालक, देवी शिक्षण संस्था