अमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याप्रकरणी शिवसेनेच्यावतीने शहर कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुखासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणे हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. परिणामी नारायण राणे यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी आणि शिस्तप्रिय पक्ष म्हणून स्वतःची प्रतिष्ठा मिरविणाऱ्या भाजप पक्षश्रेष्ठींनी नारायण राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केली आहे. यावेळी डिगंबर मानकर, अर्चना धामणे, नितीन सायवान, गुरू गिंगमिरे, अतुल थोटांगे, विनोद सुनील डहाके खडसे, विकास शेळके, ललित झंझाड आदी उपस्थित होते. त्यानंतर राजकमल चौकात ना. नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
राणेंविरूद्ध शहर कोतवालीत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:18 IST