शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयात होणार बॅकलॉग विद्यार्थ्याच्या सम सत्राच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:14 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयामध्ये हिवाळी २०२० बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या सम सत्राच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयामध्ये हिवाळी २०२० बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या सम सत्राच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाविद्यालयांनाच प्रश्नपत्रिका तयार करायच्या असून, प्रचलित पद्धतीने विद्यापीठात गुण पाठवावे लागणार आहेत.

सम सत्राच्या परीक्षांमध्ये एकूण ४० प्रश्न विद्यार्थ्यांना विचारावे लागणार आहेत. पेपर सेट महाविद्यालयांना तयार करावे लागतील. ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने बॅकलॉग विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. महाविद्यालयाने कोणत्या प्रकारची प्रश्नपत्रिका काढली, त्याची प्रत विद्यापीठाला पाठवावी लागेल. अन्यथा त्या महाविद्यालयांचे निकाल जाहीर होणार नाहीत, अशी अट लादण्यात आली आहे. बॅकलॉग परीक्षांमध्ये एकंदरीत १५ हजार विद्यार्थी असून, पाचही जिल्ह्यात ही परीक्षा महाविद्यालयात होत आहे. अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सम सत्र (दुसरे व अंतिम सत्र वगळून) ६ ते १० एप्रिल या दरम्यान होतील. अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमांचे सम सत्र (अंतिम वर्ष / अंतिम सत्र वगळून) प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २० एप्रिल या दरम्यान, तर ७ ते १२ एप्रिल या दरम्यान लेखी परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.

--------------

कोट

हिवाळी २०२० बॅकलॉग परीक्षांचे नियोजन महाविद्यालय स्तरावर होणार आहे, परीक्षा आटोपल्यानंतर प्रचलित पद्धतीने गुण पाठवायचे आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल परीक्षानिहाय, सत्रनिहाय पाठविणे बंधनकारक आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.