शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

‘सोफिया’चे पाणी तीन महिने बंद करा

By admin | Updated: May 9, 2016 00:15 IST

राज्यासह विदर्भातही पाणीटंचाईचा भीषण प्रश्न उदभवला आहे.

युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक : जलसंपदामंत्र्यांना मागण्यांच्या पूर्ततेसाठी साकडेअमरावती : राज्यासह विदर्भातही पाणीटंचाईचा भीषण प्रश्न उदभवला आहे. विशेषत: अमरावती व बडनेरा शहराला पाणीटंचाई जाणवत असल्याने नांदगाव पेठ येथील सोफिया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाला दिले जाणारे पाणी तीन महिन्यांपर्यंत बंद करण्यात यावे, अशी मागणी आ. रवि राणाद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने जलसंपदामंत्र्यांकडे करण्यात आली.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ‘सोफिया’त पाणी पुरवठ्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याची कैफियत त्यांच्या पुढ्यात मांडली. मे महिन्यात भीषण पाण टंचाई भासणार असल्याने तत्पूर्वी उपाययोजना म्हणून सोफियाला दिले जाणारे पाणी पुढील तीन महिने पर्यत बंद करुन पिण्याचे पाण्याला प्राधान्य द्यावे, असे युवा स्वाभिमानने पत्राद्वारे कळविले आहे. जिल्ह्यात निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना चारपट मोबदला देण्यात यावा, गावांचे पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात यावे, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात भूधारकांना लागू केलेला २ चा गुणक शासनाने अमरावतीत लागू करावा, भूधारक व शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी २०१३ च्या कायद्यानुसार २ चा गुणक लागू करावा, भातकुली तालुक्यात कुंड या गावाचे पुनर्वसनचे ले-आऊट तयार झाले असून येथे नागरी सुविधा उपलब्ध करून द्यावा, नागरी सुविधा मिळेपर्यंत महसूल विभागाने भूखंडाचे वाटप करू नये, असे पत्राद्वारे कळविले आहे. पेढी प्रकल्पात ज्या गावांत सहामाही बागायती करण्यात आल्यात त्या गावांना बागायती शेतीचे भाव निश्चित करावे. सिंचनाचे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, ते त्वरने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. गाव पुनर्वसन करून ग्रामस्थांना न्याय प्रदान करावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उमेश ढोणे, अभिजित देशमुख, अंकुश ठाकरे, मंगेश कोकाटे, अजय बोबडे, ज्ञानेश्वर कळसकर, बबलू दुर्गे, मंगेश इंगोले, भूषण माने, बाळासाहेब दातीर, मयूर माहोरे, विनोद पटवेकर, अमोल इंगोले आदी उपस्थित होते.