शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हातील अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करा

By admin | Updated: January 27, 2015 23:25 IST

अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये वरली मटका, जुगार, देशी दारु, गावठी दारुचे अवैध धंधे फोफावले आहे. गांज्याची खुलेआम तस्करी सुरु आहे. अ‍ॅटो, ट्रकमध्ये केरोसीनचा सर्रास वापर सुरु आहे.

अमरावती : अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये वरली मटका, जुगार, देशी दारु, गावठी दारुचे अवैध धंधे फोफावले आहे. गांज्याची खुलेआम तस्करी सुरु आहे. अ‍ॅटो, ट्रकमध्ये केरोसीनचा सर्रास वापर सुरु आहे. रेशन दुकानातही धान्याचा काळाबाजार होत आहे हे सर्व प्रकार व अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करण्यात यावे, अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना मंगळवारी देण्यात आले.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहे. वलगाव रोडवरील ट्रान्सपोर्ट नगरातून दिवसभर गुटख्याची तस्करी होते. बस स्टॅण्ड परिसरातील दारु दुकानातून दारु वर्धेला सुटकेस मार्गे जाते. रेशन दुकानदारांनी भाड्यांनी परवान दिले आहेत. रेशन धान्याचा काळाबाजार होत आहे. ती दूकान तात्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली या सर्व प्रकाराला पोलीस उत्पादन शुल्क व प्रादेशिक परिवहन विभाग दोषी आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.परिसरात अवैध धंद्यामध्ये वाढ झाल्याने युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. अनेकांचे संसार व्यसनापायी काडीमोड होण्याच्या मार्गावर आहे. जुगारही येथे मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. आठ दिवसात अवैध धंदे बंद न झाल्यास जनआंदोलन करुअसा इशारा लोकजनशक्ती पार्टीचे विभागीय अध्यक्ष आनंद वरठे, जिल्हा संघटक हिरालाल मोहिते, तसेच ईम्रानोद्दीन, सुरेंद्र थोरात, राजेश श्रीवास, बाल्या घोरपडे, बाळू डूकरे, अचलपूर तालुका अध्यक्ष गजानन गवई, मोर्शी तालुका अध्यक्ष सुनील वानखडे, दर्यापूर तालुका अध्यक्ष हिरालाल इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय मोहोड, अमरावती तालुका अध्यक्ष मंगेश घोडेस्वार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.