शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता कामगार बडतर्फ, मृदंग टर्मिनेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:39 IST

वारंवार गैरहजर राहून स्वच्छतेत हयगय करणाºया स्वच्छता कामगारास बडतर्फ करण्यात आले.

ठळक मुद्देआयुक्तांची कारवाई : यापूर्वीही केले होते निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वारंवार गैरहजर राहून स्वच्छतेत हयगय करणाºया स्वच्छता कामगारास बडतर्फ करण्यात आले. श्रीकांत रमेश गोहर असे बडतर्फ केलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याला यापूर्वी निलंबित केले होते. आयुक्त हेमंत पवार यांनी सोमवारी गोहरच्या बडतर्फीचे आदेश पारित केलेत. याशिवाय मृदंग संस्थेच्या स्वच्छता कंत्राटदाराला टर्मिनेट करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.१३ आॅगस्ट २०१६ पासून गोहर हे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अथवा रजेचा अर्ज न देता सतत गैरहजर होते. त्याबाबत त्यांना स्वास्थ्य निरीक्षकांकडून खुलासा मागविण्यात आला. त्यानंतर त्यांना ७ आॅक्टोबर २०१६ रोजी निलंबित करण्यात आले व दोषारोपत्र बजावण्यात आले. मात्र त्यांनी दिलेला खुलासा असमाधानकारक असल्याने सोमवारी आयुक्त हेमंत पवार यांनी गोहर यांना महापालिका सेवेतून बडतर्फ केले आहे. अन्य काही कामगारांवरही कारवाईची तलवार राहणार आहे.मृदंगवर १४ दिवसांनंतर कारवाईजवाहर गेट प्रभागातील स्वच्छता कंत्राटदार मृदंग मागासवर्गीय बेरोजगार संस्थेला ब्लॅकलिस्ट करुन टर्मिनेट करण्याबाबतचे निर्देश आयुक्त हेमंत पवार यांनी ४ सप्टेंबरला दिले होते.मात्र मृदंगच्या पाठीमागे चार नगरसेवक भक्कमपणे उभे राहिल्याने कारवाईत अडसर निर्माण झाला होता.मात्र त्या दबावाला न झुकता सोमवारी ‘मृदंग’ला टर्मिनेट करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तब्बल चौदा दिवसानंतर ही कारवाई करण्यात आली.