शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा कडंूनी घेतला क्लास

By admin | Updated: November 4, 2016 00:48 IST

वीज वितरण कंपनीकडून अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यात दोन वर्षांपासून नवीन सबस्टेशनची कामे मंजूर

आढावा बैठक : नादुरूस्त वीज रोहित्राची कामे करा, अन्यथा कार्यालयात धडकअमरावती : वीज वितरण कंपनीकडून अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यात दोन वर्षांपासून नवीन सबस्टेशनची कामे मंजूर असतानाही ती पूर्ण करण्यात आली नाहीत. याशिवाय कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त आहेत. सोबत नादुरूस्तीची कामे होत नसल्याने बुधवारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात क्लास घेण्यात आला. वीज वितरण कंपनीकडील सर्व विजेची कामे येत्या ८ डिसेंबर रोजी पूर्ण करावीत, अन्यथा कार्यालयात शिरून तीव्र आंदोलन करण्याचा दम आ. बच्चू कडू यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भरला आहे.अचलपूर मतदारसंघात दोन वर्षांपासून आसेगाव, असदपूर, हिवरा पूर्णा, मेघनाथपूर, खरपी, शिरजगाव कसबा, सर्फापूर, हिरूळपूर्णा आदी ठिकाणी नवीन वीज सबस्टेशन मंजूर असतानाही संबंधित कंत्राटदाराने कामेच केली नसल्याचा संताप या बैठकीत आ.कडू यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच आसेगाव पूर्णा व अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यात कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. ऐन रबी हंगाम तोंडावर आला असतानाही यावर कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे आ. कडू यांनी बैठकीत स्पष्ट केले. इंफ्रा टू मधून सबस्टेशनची कामे मंजूर आहेत. मात्र कामाची प्रगती शून्य असल्याने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. एकीकडे वीजपुरवठा कमी दाबाचा होत असताना देयके मात्र दामदुप्पट वसूल केले जातात. बिल नियमित घेता मग १२ तास नियमित वीजपुरवठा का नाही, असा प्रश्नही उपस्थित अधिकाऱ्यांना आमदारांनी केला. त्यामुळे किमान शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता सुरळीत वीज पुरवठा करण्याचा सल्लाही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिला. विजेसंबंधित शेतकऱ्यांच्या एक ना अनेक समस्या आहेत. त्यामुळे यासर्व प्रलंबित विजेच्या प्रश्नावर तातडीने कारवाई करावी, अशी सूचना आ. कडू यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान प्रलंबित कामे, दुरूती व कमी दाबाच्या वीजपुरवठाबाबतची कारवाही तातडीने करू, अशी ग्वाही अधीक्षक अभियंता भादीकर यांनी बैठकीत दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी के. आर परदेशी, वीज वीतरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर, मोहोड, गिरी, व अन्य अधिकारी, प्रहारचे मंग़ेश देशमुख, तसेच शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)