शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नवआयुक्तांकडून आज विभागप्रमुखांचा ‘क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 22:47 IST

महापालिकेचे नवे आयुक्त संजय निपाणे हे सोमवार, १८ जूनला विभागप्रमुखांचा क्लास घेणार आहेत. प्रत्येक विभागप्रमुखाला प्रत्येकी दोन तासांचा कालावधी मिळणार असून, त्यात आयुक्त त्या - त्या विभागातील समस्या व वर्तमान स्थिती जाणून घेणार आहेत.

ठळक मुद्देवर्तमानस्थितीचा घेणार आढावा : प्रलंबित विकास योजनांवरही मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेचे नवे आयुक्त संजय निपाणे हे सोमवार, १८ जूनला विभागप्रमुखांचा क्लास घेणार आहेत. प्रत्येक विभागप्रमुखाला प्रत्येकी दोन तासांचा कालावधी मिळणार असून, त्यात आयुक्त त्या - त्या विभागातील समस्या व वर्तमान स्थिती जाणून घेणार आहेत.बुधवारी मध्यान्हानंतर पद्भार सांभाळल्यानंतर संजय निपाणे दोन दिवसांच्या रजेवर गेले. ते सोमवारी पुन्हा रूजू होतील. बुधवारीच त्यांनी सोमवारच्या आढावा बैठकीची सूचना विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना केली होती. ‘एचओडी’ बैठक झाल्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांनी दोन्ही प्रभारी उपायुक्तांकडून कळीचे मुद्दे जाणून घेतले. त्यानंतर सोमवार, १८ जूनला विभागनिहाय आढावा घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार आरोग्य, बांधकाम, स्वच्छता, सामान्य प्रशासन, बाजार परवाना, पाणीपुरवठा, कार्यकारी अभियंता १ व २ अतिक्रमण, भांडार, पशुशल्य, अभिलेखागार, एडीटीपी, लेखा परीक्षण या महत्त्वपूर्ण विभागांचा आढावा घेतला जाणार आहे.२० जूनला होऊ घातलेल्या आमसभेच्या विषयपत्रिकेतील मुद्यांवरही आयुक्त जाणून घेतील. याशिवाय महत्त्वपूर्ण विभागास येणारा निधी, निधीचा विनियोग, सुरू असलेले प्रकल्प, पाईपलाईनमध्ये असलेले प्रकल्प, मंत्रालयस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकल्पांसह विभाग प्रमुखांसमोर अडचणींचाही उहापोह सोमवारच्या मॅराथॉन बैठकीत होईल. त्या अनुषंगाने प्रत्येक विभागप्रमुख कामाला लागला असून ‘साहेबां’समोर आपण कमी पडू नये, यासाठी पूर्वतयारीने वेग घेतला आहे.स्वभावशैलीचा कानोसामहापालिकेने गुडेवारांचा १३ महिन्यांचा वादळी काळ अनुभवला. पवारांचे मवाळ धोरणाचेही ते साक्षीदार ठरले. त्या पार्श्वभूमिवर नव्या आयुक्तांच्या स्वभावशैलीचा कानोसा घेतला जात आहे. साहेब चेहºयावरून कडक दिसतात. काम करवून घेण्याचीही त्यांची मानसिकता दिसून येत असल्याची चर्चा अधिकारी-कर्मचाºयांमध्ये झडू लागली आहे.